Asian Champions Trophy Hockey : भारतीय महिलांची चीनवर २-१ ने मात

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने चीनवर चुरशीच्या लढतीत २-१ अशी मात केली. एकप्रकारे आशियाई क्रीडास्पर्धेतील पराभवाचं उट्टं त्यांनी काढलं.

130
Asian Champions Trophy Hockey : भारतीय महिलांची चीनवर २-१ ने मात
Asian Champions Trophy Hockey : भारतीय महिलांची चीनवर २-१ ने मात
  • ऋजुता लुकतुके

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने चीनवर चुरशीच्या लढतीत २-१ अशी मात केली. एकप्रकारे आशियाई क्रीडास्पर्धेतील पराभवाचं उट्टं त्यांनी काढलं. (Asian Champions Trophy Hockey)

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताच्या महिला हॉकी संघाने चुरशीच्या लढतीत चीनचा २-१ असा पराभव केला आहे. खरंतर दिपीकाने १५ व्या मिनिटाला केलेला गोल आणि त्यानंतर सलीमाने २६ व्या मिनिटाला केलेला दुसरा गोल यांच्या जोरावर भारताने सुरुवातीलाच सामन्यात आघाडी घेतली होती. (Asian Champions Trophy Hockey)

पण, चीनने ४१ व्या मिनिटाला त्यांचा पहिला गोल केला आणि त्यानंतर बरोबरीच्या प्रयत्नांत जोरदार आक्रमण करून भारताच्या नाकी नऊ आणले होते. शेवटी भारतीय बचावपटूंनी हे आक्रमण थोपवण्यात यश मिळवलं आणि भारताचा साखळी फेरीतील दुसरा विजय साकार झाला. ४ गुणांसह भारतीय संघ आता गटात अव्वल आहे. (Asian Champions Trophy Hockey)

भारतीय महिलांचा चीनविरुद्धचा हा विजय आणखी एका कारणासाठी महत्त्वाचा होता. आशियाई क्रीडास्पर्घेत चीननेच भारताची घोडदौड रोखली होती आणि तिथे सुवर्णपदक हुकल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची भारताची संधी हुकली होती. (Asian Champions Trophy Hockey)

(हेही वाचा – Crude Oil Import : भारत आता रशियापाठोपाठ व्हेनेझुएलाकडून करणार तेल आयात)

सोमवारी रात्री घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघाने या पराभवाचा बदला घेतला. पण, हा विजयही सोपा नव्हता. पहिल्या क्वार्टरमध्येच दोन गोल करून भारताने आघाडी तर घेतली होती. पण, दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताच्या लालरेमसियामी या खेळाडूला पंचांनी २ मिनिटांसाठी निलंबित केलं होतं. चिनी खेळाडूला चुकीच्या पद्धतीने रोखल्याबद्दल तिच्यावर ही कारवाई झाली. (Asian Champions Trophy Hockey)

त्यामुळे सामन्यात महत्त्वाच्या क्षणी भारतीय संघ १० खेळाडूंनिशी खेळत होता. चीनने याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. पण, सुदैवाने ते भारताची बरोबरी साधू शकले नाहीत. सामना संपायला ५ मिनिटं बाकी असतानाही चीनला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. पण, भारताने हा गोल अडवला आणि भारताचा विजय साकार झाला. (Asian Champions Trophy Hockey)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.