Water Cutting In Mumbai : गुरुवारी शहर आणि पूर्व उपनगरातील ‘या’ भागात राहणार १०० टक्के पाणी कपात

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील काही विभागांमध्ये जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

267
Water Cut : मुंबईत गुरुवार आणि शुक्रवारी ५ ते १० टक्के पाणीकपात 

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील काही विभागांमध्ये जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत ९०० मिली मीटर व्यासाचा जलद्वार बदलण्याचे तसेच ३०० ते १८०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे, गुरुवारी ०२ नोव्हेंबर २०२३ पहाटे ४ वाजल्यापासून ते शुक्रवारी ०३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पहाटे ४ वाजेपर्यंत एम (पूर्व), एम (पश्चिम), एन, एल, एफ (दक्षिण) आणि एफ (उत्तर) विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अर्थात गोवंडी, देवनार, चेंबूर, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, वडाळा, शीव, परेल, काळाचौकी, लालबाग आदी भागातील पाणी पुरवठ्यावर या कालावधीत परिणाम होणार आहे. या कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. (Water Cutting In Mumbai)

पाणीपुरवठा खंडित होणाऱ्या परिसरांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे. 
१) एम/पूर्व विभाग-(खालील भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहिल)

१) अहिल्याबाई होळकर मार्ग, रफिक नगर, बाबा नगर, आदर्श नगर, संजय नगर, निरंकार नगर, ९० फूट रस्ता क्रमांक १३,१४,१५; २) मंडाला, २० फूट, ३० फूट रस्ता, एकता नगर, म्हाडा इमारती; ३) कमलरामन नगर, बैंगनवाडी मार्ग क्रमांक १०-१३, आदर्श नगर; ४) रमण मामा नगर, शिवाजी नगर रस्ता क्रमांक ०६ ते १०, शास्त्री नगर, चर्च रोड, संजय नगर भाग-२; ५) शिवाजी नगर रस्ता क्रमांक ०१ ते ०६, चर्च रोड; ६) जनता टिंबर मार्ट परिसर, लोटस कॉलनी, अब्दुल हमीद मार्ग; ७) गौतम नगर, गोवंडी स्थानक मार्ग, दत्त नगर, केना बाजार; ८) देवनार महानगरपालिका वसाहत, साठे-नगर, झाकीर हुसेन नगर, लल्लूभाई इमारती; ९) जनकल्याण सोसायटी, मानखुर्द, पी. एम. जी. पी. कॉलनी, डॉ. आंबेडकर नगर, साठे नगर, लल्लूभाई / हिरानंदानी इमारती; १०) जे. जे. मार्ग (ए, बी, आय, एफ क्षेत्र), सी, डी, ई, जी, एच, जे, के क्षेत्र, चिताकॅम्प, कोळीवाडा, पायलीपाडा, ट्रॉम्बे, कस्टम मार्ग, दत्तनगर, बालाजी मंदिर मार्ग; ११) देवनार गाव रस्ता, गोवंडी गाव, व्ही. एन. पुरव मार्ग, बी. के. एस. डी. मार्गाजवळील भाग, दूरसंचार कारखाना, बीएआरसी, नेव्हल डॉकयार्डस् मानखुर्द, मंडाला गाव, संरक्षण क्षेत्र, मानखुर्द गाव; १२) एसपीपीएल इमारती, महाराष्ट्र नगर, समता चाळ, भीम नगर रहिवाशी संघ, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर; १३) देवनार फार्म मार्ग, बोरबादेवी, घाटला, बीएआरसी कारखाना, बीएआरसी कॉलनी, गौतम नगर, पांजारापोळ (Water Cutting In Mumbai)

एम/पश्चिम विभाग (खालील भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहिल)
बीट क्रमांक १५२, १५४ आणि १५५ मधील परिसर

वैभव नगर, सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तिक पार्क, सिद्धार्थ कॉलनी, लालडोंगर, चेंबूर कॅम्प, युनियन पार्क, लालवाडी, मैत्री पार्क, अतूर पार्क, सुमन नगर, साईबाबा नगर, श्यामजीवी नगर, घाटला, अमर नगर, मोतीबाग, खारदेव नगर, वैभव नगर, एस. टी. मार्ग, सी. जी. गिडवाणी रस्ता, उमरशीन बाप्पा चौक, चेंबूर नाका, चेंबूर बाजार, चेंबूर कॅम्प

एन विभाग–(खालील भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहिल)

घाटकोपर पूर्वेतील राजावाडी पूर्वेकडील संपूर्ण परिसर, चित्तरंजन नगरसह विद्याविहार परिसर, राजावाडी रुग्णालय, एम. जी. मार्ग, पंतनगर, न्यू पंतनगर, विक्रांत सर्कल, पटेल चौक, आंबेडकर सर्कल, ९० फूट रस्ता, लक्ष्मी नगर, लक्ष्मीबाग, गरोडिया नगर, नायडू कॉलनी, शास्त्रीनगर, गुरुनानक नगर, जवाहर मार्ग, गौरीशंकर मार्ग, रमाबाई नगर, कामराज नगर, नेताजी नगर, चिरागनगर, आझाद नगर, गणेश मैदान पारशीवाडी, न्यू माणिकलाल इस्टेट मार्ग, एन. एस. एस. मार्ग, महिंद्रा पार्क, डी. एस. पथ, खलाई गाव, किरोळ गाव, विद्याविहार पश्चिम, हंसोटी गल्ली, खोत गल्ली, एम. जी. मार्ग, नवरोजी गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, जे. व्ही. मार्ग, ध्रुवराजसिंग गल्ली, गोपाल गल्ली, जीवदया गल्ली, गिगावडी, भीमनगर, पवार चाळ, लोअर भीमनगर, गुन्हे शाखा परिसर, वैतागवाडी, नित्यानंद नगर, सीजीएस कॉलनी, गंगावाडी, एमटीएनएल गल्ली, एजीएलआर मार्ग, एलबीएस मार्गालगतचा परिसर घाटकोपर (पश्चिम) श्रेयस सिग्नल इत्यादी पर्यंत. सॅनिटोरियम गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, काम गल्ली, श्रद्धानंद रस्ता, जे. व्ही. मार्ग, गोपाळ गल्ली, एलबीएस मार्ग घाटकोपर (पश्चिम), गांधी नगर शेजारील परिसर. (Water Cutting In Mumbai)

कुर्ला एल विभाग- (खालील भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहिल)
बीट क्रमांक १६९ : नेहरू नगर, शिवसृष्टी मार्ग, नाईक नगर, मदर डेअरी मार्ग, एस. जी. बर्वे मार्ग कुर्ला (पूर्व), केदारनाथ मंदीर मार्ग, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलीस वसाहत, साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, टिळक नगर.
बीट क्रमांक १७० व १७१:- कुरेशी नगर, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, स्थानक मार्ग, राहुल नगर, एवरद नगर, पानबाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अलीदादा मार्ग, स्वदेशी जेवण चाळ, चुनाभट्टी फाटक, म्हाडाकोळ प्रेम नगर, हिल रोड, मुक्तता देवी मार्ग, ताडवाडी, समर्थ नगर-पाणीपुरवठा पूर्णपणे बंद. (Water Cutting In Mumbai)
एफ/उत्तर विभाग–(खालील भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहिल)

शीव पश्चिम आणि पूर्व, दादर (पूर्व), माटुंगा (पूर्व), वडाळा, चुनाभट्टीचा भाग, प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, अल्मेडा कंपाऊंड, पंचशील नगर, वडाळा ट्रक टर्मिनल, लोढा इमारती (नवीन कफ परेड), शीव कोळीवाडा-सरदार नगर, संजय गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, कोरबी मिठागर, वडाळा येथील द्वार क्रमांक ०४ आणि ०५, भिमवाडी.)

(हेही वाचा – Share Market : मुंबई शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांनी किती कमावले? वाचा…)

एफ/दक्षिण विभाग – (खालील भागांत पाणीपुरवठा अंशत: बंद राहिल) 

रुग्णालय क्षेत्र: केईएम रुग्णालय, टाटा, बाई जेरबाई वाडिया, एमजीएम रुग्णालय;

शिवडी (पूर्व) विभाग- शिवडी किल्ला रस्ता, गडी अड्डा, शिवडी कोळीवाडा. (Water Cutting In Mumbai)

शिवडी (पश्चिम) विभाग- आचार्य दोंदे मार्ग, टी. जे. मार्ग, झकेरिया बंदर मार्ग, शिवडी छेद मार्ग. (Water Cutting In Mumbai)
४. गोलंजी इनपुट

परळ गाव पंप झोन- गं.द. आंबेकर मार्ग ५० सदनिकांपर्यंत, एकनाथ घाडी मार्ग, परळ गाव रस्ता, नानाभाई परळकर मार्ग, भगवंतराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळिंबे मार्ग, एस. पी. कंपाउंड (अंशतः). (Water Cutting In Mumbai)

काळेवाडी झोन- परशुराम नगर, जिजामाता नगर, आंबेवाडी अंशत:, साईबाबा मार्ग, मिंट कॉलनी, राम टेकडी. (Water Cutting In Mumbai)

नायगाव पंप झोन- जेरबाई वाडिया मार्ग, स्प्रिंग मिल चाळ, गं. द. आंबेकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेट्ये मंडई, भोईवाडा गाव, हाफकिन इन्स्टिट्यूट. (Water Cutting In Mumbai)

शहर उत्तर पुरवठा- दादर, जगन्नाथ भातणकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणी रस्ता, हिंदमाता यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग. (Water Cutting In Mumbai)

शहर दक्षिण पुरवठा – लालबाग, डॉ. बी. ए. रोड चिवडा गल्ली, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजिभोय मार्ग, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी क्षेत्र. (Water Cutting In Mumbai)

अभ्युदय नगर
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.