- ऋजुता लुकतुके
आशिया चषकात रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहेत. या स्पर्धेतील ही बहुप्रतिक्षित लढत आहे. आतापर्यंत आयसीसी किंवा एसीसी स्पर्धांमध्ये दोन्ही संघांची एकमेकांविरुद्धची कामगिरी पाहिली तर भारताचं पारडं वरचढ राहिलं आहे. विश्वचषकात तर पाकिस्तानला भारताविरुद्ध अवधा एक सामना जिंकता आला आहे. आणि मागच्या दहा वर्षांत झालेल्या १५ सामन्यांपैकी १२ भारताने जिंकल्या आहेत. सीमेवर असलेल्या तणावामुळे भारत – पाकिस्तान दरम्यानच्या द्वपक्षीय मालिका सध्या बंदच आहेत. पण, मोठ्या स्पर्धांमध्ये भारताने एकतर्फी विजय मिळवले आहेत. पाकचा माजी कर्णधार रशिद लतिफने संघाच्या या खराब कामगिरीचं विश्लेषण करताना भावनांमागे धावत गेल्यामुळे संधाचा पराभव झाल्याचं म्हटलंय.
(हेही वाचा – Asia Cup 2025 : हरभजन सिंगने भारत-पाकिस्तान सामन्याला दर्शवला विरोध; नक्की काय म्हणाला ?)
‘भारताविरुद्धच्या सामन्यात आम्ही भावनाशील जास्त होतो. एकाच दमात सगळ्या गोष्टी करायला जातो. त्यामुळे आम्हाला सामन्यात सखोल कामगिरीही करता येत नाही. बहुतेकवेळा आमचा पराभवच होतो,’ असं रशिद लतिफ म्हणाला आहे. उलट भारतीय संघ खेळपट्टी आणि वातावरण पाहून आपले निर्णय घेतो आणि आमच्याविरुद्ध डोकं शांत ठेवून खेळतो. त्यामुळे भारतीय संघ जिंकला आहे, असं लतिफने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे.
(हेही वाचा – Coastal Road प्रकल्पाचा खर्च पोहोचला १४ हजार ७७९ कोटींच्या घरात)
आताच्या भारतीय संघाबद्दलही लतिफने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. ‘अभिषेक, सॅमसन आणि सुर्यकुमार फलंदाजीत समतोल साधतात. आणि गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह कुठल्याही संघासाठी मोठं आव्हान असेल. या खेळाडूंमुळे सध्याचा भारतीय संघ ताकदवान संघ ठरतो,’ असं लतिफ म्हणाला. अगदी अलीकडे झालेल्या सामन्यांमध्येही भारतानेच वर्चस्व गाजवलं आहे. २०२२ च्या टी-२० विश्वचषकात विराट कोहलीने पाकविरुद्ध ८२ धावा चोपून काढल्या होत्या. तर या आधीच्या आशिया चषकात भारताने २२८ धावांनी मोठा विजय मिळवला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

