150 Wickets in T20 : टीम साऊदी टी-२० क्रिकेटमध्ये १५० बळी टिपणारा पहिला गोलंदाज

न्यूझीलंडच्या टीम साऊदीने पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत नवीन मापदंड सर केला आहे. 

194
150 Wickets in T20 : टीम साऊदी टी-२० क्रिकेटमध्ये १५० बळी टिपणारा पहिला गोलंदाज
150 Wickets in T20 : टीम साऊदी टी-२० क्रिकेटमध्ये १५० बळी टिपणारा पहिला गोलंदाज
  • ऋजुता लुकतुके

न्यूझीलंडचा अनुभवी तेज गोलंदाज टीम साऊदीने टी-२० क्रिकेटमध्ये शुक्रवारी एक ऐतिहासिक मापदंड सर केला आहे. या प्रकारात १५० बळी टिपणारा तो पहिला आंतरराष्ट्रीय गोलंदाज ठरला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत ऑकलंड इथं २५ धावांत ४ बळी घेत साऊदीने हा टप्पा सर केला. अब्बास आफ्रिदी त्याचा दीडशेवा बळी ठरला. (150 Wickets in T20)

टीम साऊदीच्या खात्यात आता ७४६ आंतरराष्ट्रीय बळी जमा झाले आहेत. (150 Wickets in T20)

(हेही वाचा – Akshar Patel on Team Selection : टी-२० विश्वचषकासाठी माझी स्पर्धा माझ्याशीच आहे)

टीम साऊदीच्या पाठोपाठ बांगलादेशचा शकीब अल हसन १४० बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा रशिद खान १३० बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचाच इश सोधी चौथ्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात १२७ बळी आहेत. (150 Wickets in T20)

सध्या न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानबरोबर ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळत आहे. आणि यातील पहिल्या सामन्यात किवी संघाने पाक संघाचा ४६ धावांनी पराभव केला. किवी संघाच्या या विजयात केन विल्यमसन, डेरिल मिचेल आणि टीम साऊदी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. (150 Wickets in T20)

New Project 2024 01 13T134850.409

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.