’हा’ डिलिव्हरी बॉय आपल्या लहान मुलीला कडेवर घेऊन करतो डिलिव्हरी, व्हिडिओ होतोय व्हायरल

124
’हा’ डिलिव्हरी बॉय आपल्या लहान मुलीला कडेवर घेऊन करतो डिलिव्हरी, व्हिडिओ होतोय व्हायरल
’हा’ डिलिव्हरी बॉय आपल्या लहान मुलीला कडेवर घेऊन करतो डिलिव्हरी, व्हिडिओ होतोय व्हायरल

डिलिव्हरी बॉयचं काम सोपं नसतं हे तर आपल्याला माहिती आहेच. उन्हातान्हाची, थंडीवाऱ्याची आणि पावसाचीही पर्वा न करता वस्तू किंवा खाणं डिलिव्हर करणारी माणसं आपलं काम प्रामाणिकपणे करत असतात. अशाच एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एक माणूस आपल्या दोन्ही मुलांना सांभाळून डिलिव्हरी करण्याचे काम चोखपणे पार पाडत आहे.

एका फूड व्लॉगरने त्याच्या घरी फूड डिलिव्हरी करायला आलेल्या झोमॅटो बॉयचा हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, हा डिलिव्हरी बॉय आपल्या दोन लहान मुलांना सोबत घेऊन आपले काम करत आहे. यावरून हे लक्षात येतेय की, तो माणूस एक चांगला पिताही आहे. जो काम करताना आपल्या मुलांनाही सांभाळण्यासाठी धडपड करतोय. असे खूप कमी वेळा पाहायला मिळते.

(हेही वाचा – Seema Haider : सीमा हैदरच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवली, तिला भेटण्यावरही बंदी)

‘आपल्या मुलांबद्दल वाटणारं प्रेम आणि त्यांची काळजी करण्याची धडपड पाहून मला तुमच्याबद्दल आदर वाटतो आहे.’ असं तो व्लॉगर त्या डिलिव्हरी बॉयला म्हणाला. त्याने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हे पाहून मला खूप प्रेरणा मिळाली आहे. एक झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर दिवसभर आपल्या मुलांसोबत उन्हातान्हात फिरतोय. यावरून लक्षात येते की, जर माणसाने मेहनत करायचं ठरवलं तर तो काहीही करू शकतो.’

हा गोड व्हिडिओ नक्की पाहा:

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तसेच या माणसाचं सगळीकडे खुप कौतुकही केलं जातंय. झोमॅटोने ही या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, ‘या आमच्या डिलिव्हरी पार्टनरचे डिटेल्स आम्हाला शेअर करावे जेणेकरून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांची मदत करू शकू.’ या व्हिडिओवरून लक्षात येते की हल्लीच्या काळात फक्त आईच आपल्या मुलांची काळजी घेऊ शकते असे काही नाही. एका पित्याने जर ठरवलं तर तो आई इतकीच आपल्या मुलांची काळजी घेऊ शकतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.