Seema Haider : सीमा हैदरच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवली, तिला भेटण्यावरही बंदी

158
Seema Haider : सीमा हैदरच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवली, तिला भेटण्यावरही बंदी
Seema Haider : सीमा हैदरच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवली, तिला भेटण्यावरही बंदी

सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकहाणीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर नोएडा येथील सीमा हैदरच्या घरी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. यासोबतच तिला भेटणाऱ्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. वास्तविक, पाकिस्तानमधील मंदिरावरील हल्ल्यानंतर सोमवारी सकाळी सीमाच्या घराभोवती लोकांची गर्दी जमू लागली.

पोलिसांना माहिती मिळताच त्याठिकाणी फौजफाटा तैनात करण्यात आला.सीमा हैदरच्या घराकडे जाणारा रस्ताही बंद करण्यात आला आहे. मात्र, ही नियमित तपासणी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सीमा हैदरच्या हालचाली आणि संपर्कांवर आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत. याप्रकरणी एटीएस पुन्हा सतर्क झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता सगळे सीमावर लक्ष ठेवून आहेत.

(हेही वाचा – AI : आता आपल्या भाषेतून शिका AI तेही मोफत; केंद्र सरकारची नवी मोहीम)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडाच्या रबुपुरा गावात सीमा हैदरच्या घरी एक इन्स्पेक्टर, २ महिला आणि पुरुष कॉन्स्टेबल तैनात आहेत. येथे दोन शिफ्टमध्ये पोलिस त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. बाहेरच्या व्यक्तीला त्यांना भेटू दिले जात नाही. सीमाचे कुटुंबीयही कोणाला भेटत नसल्याचेही सांगितले जात आहे. सीमाची तब्येत खराब असल्याचे सांगून ते लोकांना गेटवरून परत पाठवत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.