युवा पुरस्कार विजेता गुजराती भाषेतील प्रसिद्ध लेखक Raam Mori

692
राम मोरी हा गुजराती भाषेतील लघुकथा लेखक, पटकथा लेखक आणि स्तंभलेखक आहे. अगदी तरुण वायतच तो नावारुपाला आला. त्याची ओळख लोकांना तेव्हा पटली जेव्हा त्याने सौराष्ट्रच्या ग्रामीण जीवनाचे चित्रण करणाऱ्या त्यांच्या लघुकथा बनवल्या. रामचा जन्म २ फेब्रुवारी १९९३ रोजी गुजरातमधील सिहोर येथील मोटा सुर्का गावात झाला. त्याच्या आईचे नाव तेजलबा आणि वडिलांचे नाव भावसंगभाई मोरी (Raam Mori).
त्याने १७ व्या वर्षी लघुकथा लिहिण्यास सुरुवात केली. त्याच्या कथा शब्दसृष्टी, नवनीत समर्पण, एताद, तथापी आणि शब्दसार अशा गुजराती साहित्यिक मासिकांमध्ये प्रकाशित होऊ लागल्या. त्याने फॅब्रिकेशन इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्याने TV9 (गुजराती) मध्ये पत्रकार म्हणून काम केले आहे आणि नंतर कलर्स गुजरातीमध्ये तो रुजू झाला.
दिव्य भास्करमधील  ‘मुकाम वार्ता’ आणि मुंबई समाचारमधील ‘द कन्फेशन बॉक्स’ हे साप्ताहिक स्तंभ खूप गाजले. कॉकटेल जिंदगी या गुजराती मासिकासाठी त्याने (Raam Mori) ’लव्ह यू जिंदगी’ हा स्तंभदेखील लिहिला आहे. विशेष म्हणजे तो अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझममध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे. २०१६ मध्ये प्रकाशित झालेल्या महोतू या लघुकथांचा संग्रहाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला.
कॉफी स्टोरीज हा दुसरा लघुकथा संग्रह २०१८ मध्ये आला. तसेच तिसरे पुस्तक २०२० मध्ये प्रकाशित झाले. ‘मोंटू नी बिट्टू’ या गुजराती चित्रपटातून त्याने गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मारा पप्पा सुपरहिरो आणि २१एमयू टिफिन हे त्याचे चित्रपट देखील प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपट २०२१ मध्ये आले. वयाच्या तिसाव्या वर्षी त्याची लेखणी जबरदस्त चालतेय.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.