Jharkhand : झारखंडमध्ये रंगणार राजकीय नाट्य; आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची लगबग

215

जमीन घोटाळ्याच्या प्रकरणी ईडीने अटक केलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर सत्ताधारी पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाने (Jharkhand) तात्काळ पर्यायी मुख्यमंत्री म्हणून चंपाई सोरेन यांचे नाव आणि आमदारांची फौज घेऊन राजभवनात आले. मात्र राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रणच दिले नाही. त्यामुळे सध्या झारखंड राज्य हे सरकारशिवाय आहे. मात्र आता भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाने आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे.

राज्यातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीचे आमदार हैदराबादला रवाना झाले आहेत. रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर दोन चार्टर्ड विमाने तयार आहेत. या विशेष विमानाने झामुमो आणि काँग्रेसचे आमदार हैदराबादला जाणार आहेत. चंपाई सोरेन आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आलमगीर आलम रांचीमध्येच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोघेही नेते हैदराबादला जाणार नाहीत. आमदारांनी भरलेली बस रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर पोहोचली आहे. काही वेळापूर्वी आमदारांनी भरलेली बस सर्किट हाऊस सोडून विमानतळाकडे निघाली होती. १२ सीटर आणि ३३+ सीटर बस असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन बसमधून महाआघाडीचे सर्व आमदार प्रवास करत आहेत. हैदराबाद विमानतळावरही बसेस उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार विमानतळावर पोहोचताच त्यांना हॉटेलमध्ये हलवण्यात येणार आहे.  आमच्यासोबत एकूण ४३ आमदार आहेत.झारखंड विधानसभेची एकूण सदस्य संख्या ८१ आहे. यामध्ये बहुमताचा आकडा ४१ आहे. ज्या पक्षाला ४१ आमदारांचा पाठिंबा मिळेल तो पक्ष सरकार स्थापन करेल. चंपई हे बुधवारी ४३ आमदारांसह राजभवनात गेले होते तर त्यांना ४७ आमदारांचा पाठिंबा आहे. या ४७ आमदारांमध्ये जेएमएमचे २९, काँग्रेसचे १७, आरजेडीचे १ आणि सीपीआयच्या १ आमदाराचा समावेश आहे.दुसरीकडे एनडीए आहे. सध्या त्यांना ३२ आमदारांचा पाठिंबा आहे. यामध्ये भाजपचे २६, AJSU चे ३, NCP (AP) चे १ आणि दोन अपक्ष आमदारांचा समावेश आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.