सीसीटीव्ही कॅमे-यांची कमाल, लावला हजारो गुन्ह्यांचा शोध!

113

गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी पोलिसांना आता सीसीटीव्ही कॅमे-याची खूप मदत होताना दिसत आहे. ठाणे महापालिकेने नगरसेवक निधी व इतर माध्यमातून 1 हजार 598 आणि वायफायच्या माध्यमातून 250 सीसीटीव्ही कॅमेरे शहरात बसवले आहेत. परंतु यांचा फारसा काही उपयोग नाही असे ठाणे पोलिसांनी म्हटले असले, तरी गेल्या साडेचार वर्षांत याच कॅमे-यांच्या फुटेजच्या मदतीने 1 हजार 48 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. तर 144 फुटेजमध्ये कोणत्याही प्रकारचे क्लू पोलिसांना सापडू शकलेले नाही.

कॅमेरे ठरले महत्त्वाचा दुवा

ठाणे महापालिकेने सप्टेंबर 2017 पासून शहराच्या विविध भागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मोहिम हाती घेतली. यातून महिला सुरक्षेबरोबरच सोनसाखळी, चोरी, अपघात आदींसह गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी हे कॅमेरे महात्त्वाचा दुवा ठरतील या अनुषंगाने बसवण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमे-यातील 8 ते 10 टक्के कॅमेरे दररोज बंद असल्याचे पालिकेने म्हटले आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असल्याचेही पालिकेने मान्य केले आहे. तसेच, काही कॅमेरे नागरिकांनी दगड मारुन फोडले आहेत. यासंदर्भात तक्रार करुनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

( हेही वाचा: पीएनबी बॅंकेत तुमचे खाते आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी! )

144 प्रकरणांत धागेदोरे नाहीत

  • कॅमे-यांच्या माध्यमातून ठाण्यासह नवी मुंबई, मीरा रोड आदी पोलिसांनी ठाणे महापालिकेला 1 हजार 238 पत्र दिले आहेत.
  • त्यानुसार 1 हजार 48 फुटेज मिळवले आहेत.
  • 144 प्रकरणांमध्ये तर फुटेज मिळूनही पोलिसांना त्यातून काही क्लू मिळाला नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.