New Year: १ जानेवारी हा दिवस नवीन वर्ष म्हणून का साजरा केला जातो?

नवीन वर्ष सर्वप्रथम ४५ ईस. पूर्व मध्ये सुरू झाले.

261
New Year: १ जानेवारी हा दिवस नवीन वर्ष म्हणून का साजरा केला जातो?
New Year: १ जानेवारी हा दिवस नवीन वर्ष म्हणून का साजरा केला जातो?

१ जानेवारी हा जगभरातील अनेक देशांमध्ये नवीन वर्ष (New Year) म्हणून साजरा केला जातो. भारतातही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याआधी ३१ डिसेंबरला अनेक ठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते आणि रात्री १२ वाजता जल्लोष आणि आतिषबाजी करत नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. आता प्रश्न उरतो की, हा दिवस का साजरा केला जातो? कारण हिंदू धर्मानुसार गुढी पाडवा म्हणजे आपले नवीन वर्ष. मग जाणून घेऊया १ जानेवारीचे महत्त्व…

खरे पाहता हे काही आपले नवीन वर्ष नाही, मात्र इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलेले असल्यामुळे इंग्रजी आणि ख्रिस्ती यांच्या संस्कृतीचा आपल्यावर प्रभाव पडला आहे. नवीन वर्ष सर्वप्रथम ४५ ईस. पूर्व मध्ये सुरू झाले. रोमन कॅलेंडरनुसार १ जानेवारी हे नवीन वर्ष म्हणून साजरे होऊ लागले. पूर्वी रोमन कॅलेंडर मार्च महिन्यापासून सुरू व्हायचे. म्हणजे हिंदू नवीन वर्षसुद्धा साधारण मार्च-एप्रिलमध्येच येते. यामध्ये एका वर्षात एकूण ३५५ दिवस होते, मात्र रोमन हुकूमशहा ज्युलियस सीझरने हे कॅलेंडर बदलले. त्याने १ जानेवारीला नवीन वर्ष घोषित केले. त्याच्या म्हणण्यानुसार या दरम्यान हिवाळा सुरू होतो. हा हिवाळा नवीन वर्षाच्या नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला गेला. पुढे ख्रिस्ती धर्माने १ जानेवारी हाच नवीन वर्ष म्हणून स्वीकारले. कारण असे म्हटले जाते की, या दिवशी येशूचा खतना झाला होता. त्यामुळे आजच्या काळानुसार हे ख्रिस्ती वर्ष आहे असे म्हणायला हरकत नाही.

(हेही वाचा –Hope Nature Trust Award: ३६व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात अर्णव पटवर्धन आणि सौरभ महाजन यांचा सत्कार )

यास ग्रेगोरियन कॅलेंडरदेखील म्हटले जाते. आता ग्रेगोरियन कोण होते? तर ते तेरावे पोप होते. त्यांनी फतवा काढून २४ फेब्रुवारी १५८२ रोजी या कॅलेंडरला अधिकृत मान्यता दिली. ही कालगणनापद्धती मुळात ज्युलियन दिनदर्शिकेवर आधारित आहे. पण दोन्हींमध्ये ११ दिवसांचा फरक आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा तत्कालीन कॉंग्रेस सरकारने व्यवहारासाठी भारतीय कॅलेंडरचा स्वीकार न करता ग्रेगोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला. अशाप्रकारे १ जानेवारी भारतात नवीन वर्ष म्हणून साजरा होऊ लागला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.