Vande Bharat Express : कोकणात धावणार वंदे भारत; प्राथमिक चाचणी यशस्वी ठरली 

मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी हायस्पीडमध्ये रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी घेतली गेली आहे.

167

कोकणवासियांसाठी चांगली बातमी आहे. कोकणात आता वंदे भारत एक्स्प्रेसने धावणार आहे. मुंबईपासून गोव्याच्या दिशेने करण्यात आलेली प्राथमिक चाचणी यशस्वी ठरली आहे. आता गोव्याहून ही एक्स्प्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेने धावणार आहे. राज्यात मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर वंदे भारत धावत आहे.

मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी हायस्पीडमध्ये रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी घेतली गेली आहे. मुंबई ते मडगाव मार्गावर मंगळवारी यशस्वी चाचणी घेतली गेली आहे. या वंदे भारत रेल्वेचाचा वेग चांगला असल्याने कमी वेळात गोव्यात पोहोचता येणार आहे. या गाडीचा कमाल 180 किमी प्रति तास वेग आहे. या अत्याधुनिक रेल्वेमध्ये जीपीएस बेस्ड पॅसएंजर इन्फॉर्मेशन सीस्टम, बायो व्हॅक्युम टॉयलेट्स, अ‍ॅटोमेटिक दरवाजे, वायाफाय आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिम आहे.

(हेही वाचा Trambakeshwar Temple : महादेवाला हिरवी शाल घालण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी)

मुंबई ते गोवा या एक्सप्रेसने आरामदायी प्रवास

देशातील पहिली तेजस एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर धावली होती. ही एक्स्प्रेस सुरु आहे. तसेच डबल डेकर रेल्वेही या मार्गावर सुरु करण्यात आली होती. आता मुंबई ते गोवा वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. त्यामुळे आरामदायी प्रवास करता येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.