Trambakeshwar Temple : महादेवाला हिरवी शाल घालण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

निवेदन ई-मेलद्वारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आले.

108

13 मेच्या रात्री 9.41 वाजता स्थानिक ऊरुसाच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत काही मुसलमानांनी उत्तर महाद्वार येथून श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. ते एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी पिंडीवर हिरवी शाल चढवायची आहे, असा आग्रह धरला. मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी या मुसलमानांना अडवल्याने पुढील अनर्थ टळला. त्र्यंबकेश्वर येथील शंकराचे स्थान हे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असून ही घटना गंभीर आहे. यातून जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरी या प्रकरणी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक सुनील घनवट यांनी केली.

या संदर्भातील निवेदन नाशिक पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. हे निवेदन नाशिकच्या ग्रामीण साहाय्यक पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांनी स्वीकारले. या प्रसंगी सटाणा तालुक्यातील डांग सौदाणे येथील श्रीराम मंदिराचे विश्वस्त आणि डांग सौदाणे येथील माकर्ेट समिती सभापती संजय सोनावणे, धर्मप्रेमी संदीप वाघ, हिंदु जनजागृती समितीच्या नाशिक जिल्हा समन्वयक वैशाली कातकडे, तसेच प्रदीप देशमुख उपस्थित होते. हे निवेदन ई-मेलद्वारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आले.

(हेही वाचा Shri Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार; उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आदेश)

वास्तविक भारतीय राज्यघटनेप्रमाणे श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाचे अधिकार हे हिंदु धर्मीयांनाच देण्यात आले आहेत. तरी अहिंदूंनी अशी कृती करणे म्हणजे सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न आहे, असे घनवट म्हणाले. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून अमरावती, संभाजीनगर, अकोला येथे घडलेल्या घटना पहाता नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या संदर्भात झालेली घटना ही जाणीवपूर्वक सामाजिक तेढ वाढवणारी आहे. यातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे मोठे षडयंत्र असू शकते. त्यामुळे संपूर्ण राज्यात कुठेही असे प्रकार होत असतील, तर त्यात तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.