Union Bank of India : युनियन बँक ऑफ इंडियाने महिलांसाठी आणली विशेष योजना

421
Union Bank of India : युनियन बँक ऑफ इंडियाने महिलांसाठी आणली विशेष योजना
Union Bank of India : युनियन बँक ऑफ इंडियाने महिलांसाठी आणली विशेष योजना

युनियन बँक ऑफ इंडियाने ३० जून २०२३ रोजी अधिकृतपणे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (एमएसएससी), २०२३ योजना भारतातील आपल्या सर्व शाखांमध्ये सादर केली आहे. आतापर्यंत बँकेने ५,६५३ एमएसएससी लाभार्थी खात्यांमध्ये रु. १७.५८ कोटी पाठवण्यात आले आहेत.

एमएसएससी, २०२३ ही वित्त मंत्रालयाची एक प्रमुख अल्पबचत योजना आहे, जी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी आर्थिक वर्ष २०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान महिला आणि मुलींसाठी सुरू केली होती. योजनेअंतर्गत, वैयक्तिक मुली किंवा स्त्रिया एक महिला सन्मान बचत प्रमाणपत्र उघडू शकतात किंवा पालक अल्पवयीन मुलीच्या वतीने खाते उघडू शकतात. किमान १ हजार रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे आणि शंभर रुपयांच्या पटीत कोणतीही रक्कम जमा केली जाऊ शकते, त्याची कमाल मर्यादा २ लाख रुपयांपर्यंत आहे. व्यक्ती प्रत्येक खात्यामध्ये तीन महिन्यांच्या अंतराने अनेक खाती उघडू शकतात, एकूण गुंतवणूक मर्यादा २ लाख रुपये आहे.

(हेही वाचा – Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मोठा दावा, म्हणाले…)

या योजनेअंतर्गत ठेवींवर वार्षिक ७.५% आकर्षक व्याज मिळेल आणि ते तिमाही चक्रवाढ होईल. तसेच महिला सन्मान बचत प्रमाणपत्र अंतर्गत सर्व कमाई सध्याच्या आयकर तरतुदींनुसार करपात्र असेल. तथापि, योजनेअंतर्गत टीडीएस (टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स) कापला जाणार नाही. खाते उघडल्याच्या तारखेपासून दोन वर्षांनी परिपक्व होईल आणि या योजनेतील खाती ३१ मार्च २०२५ पर्यंत उघडता येतील. या योजनेत नॉमिनेशनची सुविधाही देण्यात आली आहे. खातेदार खाते उघडल्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर, पात्र शिल्लक रकमेच्या ४०% पर्यंत अंशतः पैसे काढू शकतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.