युनियन बँकेचा समाजसेवेचा आदर्श! पोलिसांना रेनकोटचे वाटप! 

विशेष म्हणजे युनियन बँकेने हे रेनकोट बनवण्याचे काम मुद्दामच ग्रामीण आणि शहरी भारतातील वंचित आणि बेरोजगार स्त्री-पुरुषांना दिले.

64

सध्याच्या कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलिस दिवस – रात्र कार्यरत असतात, तहान-भूक विसरून ते कर्तव्यासाठी हजर असतात. स्वतःच्या सुख-दुःखाच्या प्रसंगांना नजरेआड करून हे पोलिस जनतेच्या सुखासाठी झटतात, अशा पोलिसांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे जसे सरकारचे कर्तव्य असते, तसे समाजाचेही असते. या सामाजिक जाणिवेतूनच युनियन बँक ऑफ इंडियाने मुंबई पोलिसांना पावसापासून त्यांचे संरक्षण व्हावे, याकरता त्यांना रेनकोटचे वाटप केले.

पोलिसांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त! 

युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने १ जुलै रोजी मुंबई पोलिसांचे अतिरिक्त आयुक्त, नायगाव, दादर पूर्व मुंबई येथील सशस्त्र पोलिस मुख्यालयात पोलिस कर्मचाऱ्यांसाठी रेनकोटचे वाटप करण्यात आले. पोलिसांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच मुंबई पोलिसांच्या धाडसी प्रयत्नांना मदत म्हणून यशलोक वेलफेअर फाउंडेशनच्या सहकार्याने युनियन बँक ऑफ इंडियातर्फे पवासाळ्यात आवश्यक असलेले रेनकोट्सचे वाटप करण्यात आले आहे.

(हेही वाचा : महापालिकेच्या कोविड सेंटरमुळे ३०९ कुटुंबे घरापासून वंचित!)

बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला!

विशेष म्हणजे युनियन बँकेने हे रेनकोट बनवण्याचे काम मुद्दामच ग्रामीण आणि शहरी भारतातील वंचित आणि बेरोजगार स्त्री-पुरुषांना दिले. अशा प्रकारे बँकेने यामाध्यमातूनही गरजू, बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम केले आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अशावेळी युनियन बँकेचा हा रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.