Kasaragod Tourist Places : कसरगोडमध्ये फिरण्यासाठी उत्कृष्ट ठिकाणे

इथले रहिवासीसुद्धा मैत्रीपूर्ण वागतात, त्यामुळे तुम्ही स्वतःच्याच गावात आला आहात असा भास तुम्हाला होतो. मानव-निर्मिती आणि निसर्गाचा चमत्कार म्हणजे कसरगोड... तर आता आपण जाणून घेऊया इथे तुम्ही कोणकोणत्या ठिकाणांना भेट देऊ शकता?

84
Kasaragod Tourist Places : कसरगोडमध्ये फिरण्यासाठी उत्कृष्ट ठिकाणे

केरळ राज्यात स्थित एक प्रेक्षणीय स्थळ म्हणजे कसरगोड… समुद्रकिनारे, बॅकवॉटर्स आणि ऐतिहासिक किल्ल्यांसाठी प्रसिद्ध असलेला एक सुंदर जिल्हा म्हणजे कसरगोड. इथे असंख्य किल्ले, वन्यजीव, अभयारण्ये आहेत, तुम्ही कसरगोडमध्ये गेलात तर तुम्हाला तिथेच स्थायिक व्हावेसे वाटेल. इतके ते ठिकाण सुंदर आहे. (Kasaragod Tourist Places)

इथले रहिवासीसुद्धा मैत्रीपूर्ण वागतात, त्यामुळे तुम्ही स्वतःच्याच गावात आला आहात असा भास तुम्हाला होतो. मानव-निर्मिती आणि निसर्गाचा चमत्कार म्हणजे कसरगोड… तर आता आपण जाणून घेऊया इथे तुम्ही कोणकोणत्या ठिकाणांना भेट देऊ शकता? (kasaragod tourist places)

अनंत पद्मनाभस्वामी मंदिर :

हे तलावाच्या मध्यभागी बांधलेले हिंदूंचे पवित्र मंदिर आहे. विशेष म्हणजे केरळमधील हे एकमेव मंदिर आहे, जे तलावाच्या मध्यभागी आहे. हे अनंत पद्मनाभस्वामींचे मूळ स्थान असल्याचे मानले जाते. (Kasaragod Tourist Places)

चंद्रगिरी किल्ला :

हा किल्ला १७ व्या शतकात बांधला गेला होता. हा किल्ला नदीच्या काठावर वसलेला आहे. विशेष म्हणजे हा किल्ला अतिशय भव्य आणि प्रचंड मोठा आहे. (Kasaragod Tourist Places)

(हेही वाचा – Ashish Shelar : चार सदस्यीय प्रभाग रचनाही “नगरराज बिलाला” अपेक्षितच – ॲड. आशिष शेलार)

बेकल किल्ला :

हा किल्ला राष्ट्रीय महामार्गावर दक्षिण कसरगोडपासून १६ किमी अंतरावर आहे. या किल्ल्यावरून अरबी समुद्रात उसळणाऱ्या लाटांचे सुंदर नजारे पाहायला मिळतात. (Kasaragod Tourist Places)

राणीपुरम हिल्स : 

समुद्रसपाटीपासून ७५० मीटर उंचावर वसलेली ही टेकडी म्हणजे निसर्गाचं देखणं रुप आहे. इथे काही गुंफा आहेत, हत्ती तर इथे सहज फिरताना दिसतात. तुम्हाला जर ट्रेकिंग करायची असेल तर यापेक्षा चांगली जागा सापडणार नाही. (Kasaragod Tourist Places)

कपिल बीच :

हे बीच बेकल किल्ल्यापासून ६ किमी अंतरावर आहे. सूर्य उगवताना (sunrise) आणि सूर्य मावळताना (sunset) पाहणे हे खरेच अद्भुत असते. आणि कसरगोड येथील कपिल बीच वरचा सूर्यप्रकाश तर स्वर्गाचा आनंद देतो. तुम्ही एका वेगळ्याच जगात प्रवेश करता. (Kasaragod Tourist Places)

(हेही वाचा – Mumbai Customs Department: मध्ययुगीन काळातील ५ खंजीर, १ दुर्मीळ दमास्कस पोलादी घडीचा चाकू सीमाशुल्क विभागाकडे सुपूर्द)

मधुर सिद्धिविनायक मंदिर :

कसरगोडपासून ८ किमी अंतरावर महागणपती मंदिर आहे. दरवर्षी भाविक श्रद्धेने इथे येतात आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन जातात. हे मंदिर मधुवाहिनी नदीच्या तटावर बांधलेले आहे. हे मंदिर म्हणजे वास्तुकलेचा उत्कृष्ट नजराणा आहे. (Kasaragod Tourist Places)

अजानूर :

कसरगोडमधील हे एक छोटसं गाव आहे. इथे प्रसिद्ध मदियां कूलम मंदिर आहे. कनहंगडपासून सुमारे ५ किमी अंतरावर असलेले हे गाव पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. इथे भद्रकालीचे मुख्य मंदिर आहे. विशेष म्हणजे या मंदिरात ब्राह्मण पुजारी दुपारी पूजा करतात तर सकाळ-संध्याकाळी मुनियानी संप्रदायाचे लोक येऊन पूजा करतात. (Kasaragod Tourist Places)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.