मलेशियाच्या धर्तीवर कमला नेहरु पार्कमध्ये ‘ट्री वॉक’

78

म्हातारीचा बूट म्हणून परिचित असलेल्या आणि हँगिंग गार्डनचा भाग असलेल्या कमला नेहरु उद्यानाच्या पायथ्याशी  निसर्ग उन्नत मार्ग अर्थात ट्री वॉक उभारण्यात येत असून यासाठी मलेशियाच्या धर्तीवर हे ट्री वॉक उभारले  जाणार आहे. या कामासाठी मलेशियातीलच कंपनी पात्र ठरली असून एरव्ही भारतातील कंपन्या या उणे दरात फोन बोली लावतात. परंतु या परदेशी कंपनीने ट्री वॉक बनवण्यासाठी ५० टक्के जास्त दरात या कामासाठी बोली लावली आहे. त्यामुळे या कामासाठी प्रशासनाच्या १२ कोटी रुपयांच्या तुलनेत एकमेव असलेल्या या मलेशियातील कंपनी १८ कोटी ४४ लाख रुपयांची बोली जावून काम मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

१२ कोटी रुपयांचा आराखडा तयार

मलबारहिलमधील कमला नेहरु पार्कच्या सौंदर्यात आणखी एक पडणार आहे. याठिकाणी पशु-पक्ष्यांचे मुक्त विहार न्याहाळता यावे, तसेच पक्ष्यांचे आवाज ऐकता यावे यासाठी कमला नेहरु पार्कमध्ये निसर्ग उन्नत मार्ग अर्थात ट्री वॉकचे बांधकाम करण्यात येणार आहे. याच्या बांधकामाचा सुमारे १२ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. परंतु यासाठी मागवण्यात आलेल्या निविदेमध्ये केवळ एकमेव कंपनीने भाग घेतला होता आणि या एकमेव कंपनीचा प्रस्ताव जलअभियंता विभागाने मंजुरीसाठी स्थायी समितीच्या पटलावर ठेवला आहे. या कंपनीने ४९.९५ अधिक दराने काम  मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्याशी वाटाघाटी केल्यानंतर त्यांनी हा दर ३९.९६ एवढा करण्यास तयारी दर्शवली आहे.

एच.एम.व्ही. असोसिएशन ही कंपनी पात्र ठरली

यामध्ये कोणत्याही प्रकारची वृक्षतोड न करता व वन्यजीवांची हानी न करता याठिकाणी फेरफटका मारण्यासाठी निसर्ग उन्नत मार्ग अर्थात ट्री वॉक बांधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कामासाठी सुमारे ३०० चौरस मीटर एवढी मोठ्या प्रमाणात साल लाकडाची आवश्यकता असून हे लाकूड भारतात उपलब्ध न झाल्यास परदेशातून मागवले जाणार आहे. तसेच हे लाकूड अपेक्षित आकारांमध्ये उपलब्ध होण्यासाठी फॅक्टरीमधून कापून आणले जाणार आहे. या कामांसाठी मागवलेल्या निविदेमध्ये एच.एम.व्ही. असोसिएशन ही कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीने लेजंड सं प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत संयुक्त भागीदारीत हे काम मिळवले आहे. या कंपनीने मलेशियातील केपांग, सेलानगोर, वनसंशोधन संस्था येथे पर्यावरण पर्यटन सुविधेचे अर्थात कॅनॉपी-पायवाट २ व निसर्ग उन्नत मार्ग बनवला आहे. डिसेंबर २०१९ मलेशियातील हे काम पूर्ण करण्यात आले आहे.

कंत्राटदार म्हणतो म्हणून पैसे वाढले

  •  या कामांसाठी यांत्रिकी ऐवजी मनुष्यबळाचाच अधिक वापर होणार
  •  प्रत्येक खांबांच्या ठिकाणी  काँक्रिटचे पंपिंग करण्यास अडचणी
  •  साल लाकूड उपलब्ध करणे आणि कटींग करणे
  • डोंगर भाग असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे
  • शांतता क्षेत्र असल्याने कामगारांची राहण्याची व्यवस्था अन्य ठिकाणी करणे
  •  प्रत्येक वस्तूंच्या दरांमध्ये झालेली वाढ
  • दोष दायित्व काळात विदयुत कामे व लाकडांची दुरुस्ती
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.