Top Stocks : कोणत्या शेअरने मिळवू शकता पैसे?; एक्सपर्टने सुचवले ‘हे’ पाच स्टाॅक्स

103

सध्या सणासुदीचे महिने सुरु आहेत. हे सणासुदीचे महिने शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठीही खूप कामाचे ठरु शकतात आणि खर्चाऐवजी मोठी कमाई करुन देऊ शकतात. ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीज (Axis Securities) ने अशा 5 शेअरची यादी केली आहे, जे या सणासुदीच्या हंगामात गुंतवणूकदारांसाठी कमाईचे साधन बनू शकतात.

मारुती सुझुकी ( Maruti Suzuki)

अॅक्सिस सिक्युरिटीजच्या या ताज्या रिपोर्टमध्ये पहिले नाव देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीचे आहे. पॅसेंजर कार मार्केटमध्ये मारुती सुझुकीचा सर्वात मोठा वाटा असल्याने त्याचा फायदा होणे निश्चितच आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन, अॅक्सिस सिक्युरिटीजने मारुती सुझुकीच्या स्टाॅकला 9 हजार 801 रुपयांचे टार्गेट प्राईस दिले आहे. तसेच, अॅक्सिस सिक्युरिटीजचा असा विश्वास आहे की नुकतीच लाॅंच केलेली माॅडेल्स कंपनीचा बाजारातील हिस्सा वाढवण्यास मदत करु शकतात.

बजाज फायनान्स ( Bajaj Finance)

बजाज फायनान्सची गणना देशातील सर्वात मोठ्या नाॅन बॅंकिंग फायनान्शिअल कंपन्यांमध्ये केली जाते. ही एनबीएफ कंपनी सध्या 1 हजार 368 शहरी शाखा आणि 2 हजार 218 ग्रामीण शाखांसह 1.3 लाथ डिस्ट्रब्यूशन पाॅईंटच्या मदतीने कोटीपेक्षा जास्त ग्राहकांना सेवा देत आहे.

एसबीआय कार्ड आणि पेमेंट सर्व्हिसेस ( SBI Cards and payment Services)

देशातील सर्वात मोठ्या बॅंकेची ही उपकंपनी भारतातील मोठी क्रेडिट कार्ड जारी करणा-या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीला सणासुदीच्या खरेदीमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. रुपे क्रडिट कार्ड यूपीआयशी लिंक करण्याच्या रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयाचा फायदा एसबीआय कार्डलाही होणार आहे. या बाबी लक्षात घेऊन, अॅक्सिस सिक्युरिटीजने या स्टाॅकला सध्याच्या 958.35 रुपयांच्या किमतीच्या तुलनेत रुपये 1 हजार 50 ची टार्गेट प्राईस दिली आहे.

( हेही वाचा: King Charles III : चार्ल्स यांनी स्वीकारला ब्रिटनच्या महाराज पदाचा पदभार )

ट्रेंट ( Trent)

टाटा समूहाची ही कंपनी ब्रॅंडेड रिटेल सेगमेंटमध्ये वेगाने पाय पसरवत आहे. ही कंपनी पाच काॅन्सेप्ट वेस्टसाइड, ज्युडिओ, स्टार, लॅंडमार्क आणि उत्सा स्टोअर्स चालवते. प्रीमियम रिटेल सेगमेंटमध्ये ट्रेंट ही टाटा समूहाची कंपनी आहे. सणासुदीच्या खरेदीमुळे या काळात कंपनीच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.

रिलॅक्सो फुटवेअर्स ( Relaxo Footwears)

हा भारतातील घरोघरी जाणारा ब्रॅंड आहे. विशेषत: ग्रामीण बाजारपेठांमध्ये, रिलॅक्सोचा मोठा प्रभाव आहे. व्हॅल्यू फाॅर मनी प्राॅडक्ट बनवणा-या या कंपनीचे शूज आणि चप्पल ही उत्पादने खूप खरेदी केली जातात. ग्रामीण बाजारपेठांमध्ये सणासुदीच्या खरेदीत अशा उत्पादनांची अधिक विक्री होते. अॅक्सिस सिक्युरिटीजला असा विश्वास आहे की सणासुदीच्या काळात छोट्या शहरांमध्ये, ग्रामीण बाजारपेठांमध्ये रिलॅक्सोची मजबूत उपस्थिती फायदेशीर ठरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.