मुंबईतील ‘या’ भागातून प्रवास करणार असाल, तर ही बातमी महत्त्वाची…

209

मुंबई म्हणजे धावपळीचे शहर. मुंबई हे असं शहर आहे जे कधीच थांबत नाही. घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई आज, १७ मे मंगळवार रोजी काहीशी विस्कळीत होताना दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान नियोजित VIP हालचालींमुळे, सांताक्रूझ विमानतळ, मुंबई विद्यापीठ, अमर महल, छेडा नगर, फ्रीवे आणि यलो गेट परिसरातील वाहतूकीचा वेग मंद राहणार आहे. यासंदर्भात मुंबई ट्राफिक पोलिसांनी ट्विट करत माहिती दिली आहे. या वरील भागातील वाहतूक धिम्या गतीने सुरू राहणार असल्याने नागरिकांनी त्यानुसार त्यांच्या येण्या-जाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन मुंबई ट्राफिक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR) आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या पूर्व उपनगरात प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना शनिवारपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे कारण शुक्रवारी रात्रीपासून JVLR उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामामुळे बंद करण्यात आला आहे. महामार्गावरील मुंबई ते ठाणे आणि पवई ते ठाणे या मार्गांवर आणि JVLR या मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी होते. १३ मे पर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) कडून सुरू असलेले दुरुस्तीचे काम संपून उड्डाणपूल पुन्हा वाहनधारकांसाठी खुला होणे अपेक्षित असताना ही समस्या कायम राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. त्यामुळे मुंबईकरांना हे मार्ग बंद असल्याने मुंबईतून प्रवास करताना वाहतूकीच्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

(हेही वाचा – मुंबईतील ‘हा’ उड्डाणपूल १२ दिवस वाहतुकीसाठी पूर्णत: बंद!)

या कामासाठी उड्डाणपूल राहणार बंद

मिळालेल्या माहितीनुसार, या उड्डाणपुलाच्या २०० बेअरींग बदलण्यासह एक्सपान्शन जॉइंट अर्थात दोन स्पॅनमधील सांधे बदलण्याचे काम तीन महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले. वाहतूक बंद न करता बेअरींग बदलण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत २०० पैकी १४८ बेअरींग बदलण्यात आल्याची माहिती . जितके बेअरींग बदलण्यात आले आहेत, त्या भागातील एक्सपान्शन जॉइंट आता बदलण्यात येतील. या कामासाठी मात्र उड्डाणपूल बंद ठेवावा लागणार आहे. या काळात उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरू राहील. एक्सपान्शन जॉइंट बदलण्याचे काम दुसऱ्या टप्प्यातही करण्यात येणार आहे. यानंतरही एक्सपान्शन जॉइंट बदलण्यासाठी उड्डाणपूल काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.