‘हे’ तीन जिल्हे भ्रष्टाचारात अव्वल क्रमांकावर…

69

राज्यातील पुणे, नाशिक आणि औरंगाबाद हे तीन जिल्हे भ्रष्टाचारात सर्वात पुढे आहे, तर मुंबई भ्रष्टाचारामध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्ध केलेल्या १ जानेवारी ते ६ डिसेंबर २०२१ अहवालानुसार या तीन सर्वाधिक सापळे रचले गेले आहे. ठाणे परिक्षेत्रात केवळ ७८ सापळे रचण्यात आले, त्यात एकट्या मुंबईत ४४ जणांना लाच घेताना कारवाई करण्यात आलेली आहे.

लॉकडाऊनमुळे रखडलेली सरकारी कामे करून देण्यास वेग

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असताना सरकारी कार्यालय, शाळा, कॉलेज इत्यादी हळूहळू सुरू होत आहे. राज्याची परिस्थिती पूर्वपदावर येत असताना कोविड-१९ मुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जनतेची रखडलेली सरकारी कामे करून देण्यास वेग आला आहे. मात्र या कामासाठी जनतेकडून चिरीमिरीची अपेक्षा करणाऱ्या सरकारी, निमसरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात वाढ झालेली आहे. अगोदरच लॉकडाऊनमुळे जनता मेटाकुटीला आलेली असतांना चिरीमिरीची अपेक्षा करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना कंटाळलेली जनता आता थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे दार ठोठावत आहे.

(हेही वाचा विधान परिषदेच्या ‘त्या’ १७ जागा भाजपचे बिघडवणार गणित )

मुंबईत सर्वात कमी लाचखोरी

राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात १ जानेवारी ते ६ डिसेंबर २०२१ पर्यंत राज्यभरात ७११ सापळे लावून १००८ जणांना अटक करण्यात आलेली आहे. ‘अपसंपदा’चे ७ गुन्हे, तर अन्य भ्रष्टाचाराचे २ गुन्हे राज्यभरात दाखल झाले आहे. कारवाई करण्यात आलेल्या ८ परिक्षेत्रा पैकी पुणे, नाशिक आणि औरंगाबाद हे परिक्षेत्र भ्रष्टाचारामध्ये अव्वल क्रमांकावर आहे. पुणे परिक्षेत्रात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर हे पाच जिल्हे असून या ५ जिल्ह्यांत १५३ सापळे लावून कारवाई करण्यात आली आहे. एकट्या पुण्यात ६३ कारवाई करण्यात आली आहे. त्या खालोखाल नाशिक परिक्षेत्राचा भ्रष्टाचाराचा क्रमांक लागतो. नाशिक परिक्षत्रात नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे ५ जिल्हे येतात, या परिक्षेत्रात १२३ गुन्हे दाखल करण्यात आलेले असून एकट्या नाशिक जिल्ह्यात ३८ गुन्हे दाखल झाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद परिक्षेत्र असून या अवघे ४ जिल्हे असून त्यात जालना, बीड, उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्हे आहेत, या परिक्षेत्रात वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२१ गुन्हे दाखल केले आहे. या परीक्षेत्रात एकट्या औरंगाबाद मध्ये ५१ यशस्वी सापळे लावण्यात आले होते. राज्यातील ८ परिक्षेत्रापैकी मुंबईत सर्वात कमी म्हणजे वर्षभरात लाचखोरीची केवळ ४४ प्रकरणे समोर आली आहेत, मात्र अपसंपदाची ४ गुन्हे मुंबई परिक्षेत्रात दाखल आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.