Salman Khan च्या हत्येसाठी पाकिस्तानातून हत्यारं! काय होता नेमका कट?

226
Salman Khan च्या हत्येसाठी पाकिस्तानातून हत्यारं! काय होता नेमका कट?
Salman Khan च्या हत्येसाठी पाकिस्तानातून हत्यारं! काय होता नेमका कट?

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानला (Salman Khan) ठार करण्याचा एक कट उघड झाला आहे. या कटात बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) हात आहे हे देखील समोर आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बिश्नोई गँगने सलमान खानच्या (Salman Khan) कारवर हल्ला करण्याचा कट रचला होता. पाकिस्तानातून हत्यारं पुरवणाऱ्या एका माणसाकडून हत्यारंही मागणवण्याचीही योजना आखण्यात आली होती. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली आहे. (Salman Khan)

पाकिस्तानच्या बेकायदा शस्त्र विक्रेत्याकडून बंदुका खरेदी

नवी मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) कारवर पनवेलमध्ये हल्ला करण्याची योजना लॉरेन्स बिश्नोई गँगने आखली होती. बिश्नोईचा मोठा भाऊ अनमोल आणि त्याचा साथीदार गोल्डी ब्रार (Goldie Brar) या दोघांनी पाकिस्तानच्या एका बेकायदा शस्त्र विक्रेत्याकडून एके ४७, एम १६ यांच्यासह अत्याधुनिक बंदुका खरेदी केल्या होत्या आणि त्या महाराष्ट्रात पाठवून त्याच्या कारवर हल्ला करुन त्याला ठार करण्याची योजना आखण्यात आली होती. सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानावर जो हल्ला झाला, त्याआधी बिश्नोई गँगने हा कट आखला होता. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. (Salman Khan)

चार जणांना अटक

पोलिसांना ही माहितीही मिळाली आहे की, सलमान खानच्या (Salman Khan) कारवर किंवा त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर हा हल्ला होणार होता. सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आता ही माहिती समोर आली आहे. नवी मुंबई पोलिसांचं हे म्हणणं आहे की त्यांना त्यांच्या खबऱ्यांकडून ही माहिती मिळाली की, सलमान खानच्या (Salman Khan) घरावर हल्ला होण्यापूर्वी त्याच्या कारवर हल्ला होणार होता. त्यानंतर त्यांनी या प्रकरणात एकूण चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून या प्रकरणाची अधिक चौकशी केली जाते आहे. (Salman Khan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.