घरातून पळून जाण्याचं मुलांचं प्रमाण वाढतंय; रेल्वे पोलिसांनी ४ महिन्यांत ५०२ मुलांची केली सुटका

76

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) शासकीय रेल्वे पोलीस (GRP) मध्य रेल्वेतील रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत गेल्या ४ महिन्यांत म्हणजे जानेवारी-२०२२ ते एप्रिल-२०२२ या कालावधीत ५०४ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ३३० मुले आणि १७४ मुलींचा समावेश आहे आणि चाइल्डलाइनसारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांच्या पालकांची भेट करून दिली आहे.गेल्या वर्षी म्हणजे २०२१ च्या जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वे आरपीएफ ने पोलीस कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ६०३ मुले आणि ३६८ मुलींसह एकूण ९७१ मुलांची सुटका केली होती.

( हेही वाचा : ‘या’ लोकांसाठी बूस्टर डोसमधील अंतर केले कमी )

रेल्वे मंत्रालयाने मुलांच्या सुटकेसाठी जारी केलेल्या प्रमाणित कार्यप्रणालीद्वारे बंधनकारक केलेल्या जबाबदारीचे पालन करण्यात येत आहे आणि “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत हरवलेल्या तथा घरातून पळून आलेल्या मुलांच्या सुटकेसाठी इतर भागधारकांसोबत काम करत आहे. ज्या ५०४ मुलांची सुटका केली आहे यांतील काही मुले भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगल्या आयुष्याच्या किंवा शहरातील ग्लॅमरच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्टेशनवर येणारी हि मुले प्रशिक्षित आरपीएफ कर्मचार्‍यांना सापडतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात.

गेल्या वर्षी म्हणजे २०२१ च्या जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वे आरपीएफ ने शासकीय रेल्वे पोलीस (GRP) आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ६०३ मुले आणि ३६८ मुलींसह एकूण ९७१ मुलांची सुटका केली आहे.

चाइल्डलाइन संस्थेची मदत

रेल्वेने अलीकडेच असोसिएशन फॉर व्हॉलंटरी ॲक्शन (AVA) सोबत देशातील रेल्वेमार्गे होणारी मानवी तस्करी समाप्त करण्याच्या प्रकल्पावर काम करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. ही संघटना ‘बचपन बचाओ’ आंदोलन म्हणूनही ओळखली जाते, जी नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या चिल्ड्रन फाऊंडेशनशी संबंधित आहे. आरपीएफ ने “ऑपरेशन AAHT” (Action Against Human Trafficking- मानवी तस्करी विरुद्ध कृती) सुरु केले आहे आणि रेल्वेद्वारे मानवी तस्करी विरुद्ध कठोर कारवाई केली आहे. तसेच संभाव्य मानवी तस्करीच्या बळींना तस्करांच्या तावडीतून सोडवत आहे.

मध्य रेल्वेवर जानेवारी ते एप्रिल २०२२ पर्यंत सुटका केलेल्या मुलांचे विभागनिहाय विभाजन-

  • मुंबई विभागात या कालावधीत बालकांच्या सुटकेची सर्वाधिक २८५ प्रकरणे नोंदवली गेली, ज्यात २०६ मुले आणि ७९ मुलींचा समावेश आहे.
  • पुणे विभागात ५० मुले आणि २१ मुलींचा समावेश असलेल्या ७१ मुलांची सुटका प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत
  • भुसावळ विभागात बालकांच्या सुटकेच्या ९२ गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात ४७ मुले आणि ४५ मुलींचा समावेश आहे
  • नागपूर विभागात बालकांच्या सुटकेच्या ३२ प्रकरणांची नोंद झाली असून त्यात १२ मुले आणि २० मुलींचा समावेश आहे
  • सोलापूर विभागात बालकांच्या सुटकेच्या २४ गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात १५ मुले आणि ९ मुलींचा समावेश आहे
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.