‘माउंट एव्हरेस्ट’वर प्रथमच तिरंगा फडकावणारे पद्मश्री सोनम वांग्याल यांचा ‘शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मान

123
1965 मध्ये भारतीय लष्कराने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर प्रथमच तिरंगा फडकावून इतिहास रचला होता. या ऐतिहासिक मोहिमेचा पद्मश्री सोनम वांग्याल हे एक भाग होते. गिर्यारोहण या रोमांचकारी आणि साहसी खेळाला वांग्याल यांनी छंद म्हणून न जोपासता भारतीय लष्करात भरती होऊन या कलेचा देशसेवेसाठी उपयोग केला. देशातील युद्धातही त्यांनी सहभाग घेतला होता. सोनम वांग्याल यांची या साहसी खेळासोबतच देशाप्रती असलेली निष्ठा, प्रेम आणि समर्पणाची भावना वेळोवेळी सिद्ध झाली आहे. त्यामुळे वांग्याल यांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने ‘शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कार २०२१’ दिला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने दरवर्षी शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार, तसेच शिखर सावरकर पुरस्कार दिले जातात. रविवार, २२ मे २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाला.

वांग्याल ‘लडाखचा हिरो’ 

पर्वतारोहण क्षेत्रातील कौतुकास्पद कामगिरीबद्दल वांग्याल यांना राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. देशाच्या गिर्यारोहणाच्या इतिहासात पद्मश्री सोनम वांग्याल यांच्या कार्याचा उल्लेख सुवर्णाक्षरांनी केला जाईल. त्यांनी लोकोपयोगी नि:स्वार्थी जीवन व्यथित केल्याप्रकरणी वांग्याल यांना ‘लडाखचा हिरो’ ही पदवी देण्यात आली आहे. वयाच्या या टप्प्यावरही वांग्याल गिर्यारोहण क्षेत्रात अथक परिश्रम करत आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.