Swatantra Veer Savarkar : तरुणाईसाठी चित्रपट बनवला आहे, त्यांनी तो पहावा; रणदीप हुड्डाने केले आवाहन

Swatantra Veer Savarkar : विस्मृतीत गेलेल्या क्रांतीकारकांना पुन्हा समाजासमोर आणणे, ही माझी मोहिम आहे. गावागावांत आपले क्रांतीकारक म्हणजे देशाचे खरे हिरो पोहोचावेत, ही माझी इच्छा आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी पहावा आणि खरा इतिहास जाणून घ्यावा.

169
Swatantra Veer Savarkar : तरुणाईसाठी चित्रपट बनवला आहे, त्यांनी तो पहावा; रणदीप हुड्डाने केले आवाहन
Swatantra Veer Savarkar : तरुणाईसाठी चित्रपट बनवला आहे, त्यांनी तो पहावा; रणदीप हुड्डाने केले आवाहन

२२ मार्च रोजी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar) चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट मी तरुणांना डोळ्यांसमोर ठेवून बनवला आहे. सामान्यपणे ऐतिहासिक चित्रपटांमध्ये भाषणे अधिक असतात. मी हा चित्रपट बनवताना तो रटाळ होऊ नये, याची काळजी घेतली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही केला आहे. ऐतिहासिक असला, तरी तो चित्रपटच आहे. त्यामुळे त्याचा आनंद घेता यावा, असे सादरीकरण करण्यात आले आहे. तरुणांनी आणि सर्वच वयोगटांतील लोकांनी हा चित्रपट पहावा, असे आवाहन ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याने केले आहे.

(हेही वाचा – IIT Student ISIS : आयआयटीचा विद्यार्थी तौसिफ अल फारूकी ISIS च्या संपर्कात; वसतीगृहात सापडला इसिसचा झेंडा)

सुदर्शन वाहिनीवर (Sudarshan Vahini) मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत तो बोलत होता. या मुलाखतीत हुड्डा याने सावरकरांविषयीचा चित्रपट बनवताना आलेले अनुभव सांगितले.

क्रांतीकारकांना पुन्हा समाजासमोर आणणे, ही माझी मोहिम

रणदीप हुड्डा या वेळी म्हणाला की, मी हरियाणातील जाट समुदायातील आहे. दिसतो पण तसाच. त्यामुळे वीर सावरकरांचे व्यक्तिमत्त्व साकारण्यासाठी मी खूप कष्ट घेतले. माझे ३२ किलो वजन कमी केले. हा चित्रपट मी वीर सावरकर यांच्याविषयीच्या लोकांच्या भावना जागवण्यासाठी बनवला आहे. त्याला लोकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. पुण्यातील स्क्रीनिंगला गेलो होतो, तेव्हा लोक मला नमस्कार करत होते. हा वेगळा अनुभव होता. विस्मृतीत गेलेल्या क्रांतीकारकांना पुन्हा समाजासमोर आणणे, ही माझी मोहीम आहे. गावागावांत आपले क्रांतीकारक म्हणजे देशाचे खरे हिरो पोहोचावेत, ही माझी इच्छा आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी पहावा आणि खरा इतिहास जाणून घ्यावा. (Swatantra Veer Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.