Swami Shraddhanand : हिंदूंच्या शुद्धीकरणाची चळवळ तळमळीने राबवणारे स्वामी श्रद्धानंद

266
Swami Shraddhanand : हिंदूंच्या शुद्धीकरणाची चळवळ तळमळीने राबवणारे स्वामी श्रद्धानंद
Swami Shraddhanand : हिंदूंच्या शुद्धीकरणाची चळवळ तळमळीने राबवणारे स्वामी श्रद्धानंद

स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म २२ फेब्रुवारी १८५६ रोजी पंजाब प्रांतातील जालंधर जिल्ह्यातील तलवान नावाच्या गावात झाला. (Swami Shraddhanand) त्यांच्या वडिलांचे नाव लाला नानकचंद होते, त्यांची नियुक्ती ईस्ट इंडिया कंपनीच्या ‘युनायटेड प्रोव्हिन्स’ (सध्याचे उत्तर प्रदेश) येथे पोलीस अधिकारी म्हणून झाली होती. श्रद्धानंदजींचे बालपणीचे नाव ‘बृहस्पती’ होते, नंतर त्यांना ‘मुंशीराम’ या नावानेही संबोधले जाऊ लागले.

शिक्षण आणि वैदिक धर्माच्या प्रचारासाठी जीवन समर्पित

स्वामीजी भारतीय शिक्षणतज्ञ, स्वातंत्र्यसैनिक आणि आर्य समाजाचे (Arya Samaj) संन्यासी होते. त्यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या शिकवणुकीचा प्रसार केला. स्वातंत्र्य, स्वराज्य, शिक्षण आणि वैदिक धर्माच्या प्रचारासाठी आपले जीवन समर्पित करणार्‍या भारतातील महान देशभक्त संन्याशांमध्ये त्यांचे (Swami Shraddhanand) नाव आदराने घेतले जाते. त्यांनी गुरुकुल कांगडी विद्यापीठ (Gurukul Kangri University) इत्यादी शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. १९२० च्या दशकात हिंदू समाज आणि भारताचे संघटन आणि शुद्धी चळवळ चालविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

(हेही वाचा – Mahalakshmi Saras Exhibition : मुंबईत २६ डिसेंबरपासून ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन; गिरीश महाजन यांची माहिती)

श्रद्धानंद हे अस्पृश्यांचे सर्वांत मोठे आणि खरे हितचिंतक – बाबासाहेब आंबेडकर 

स्वा. सावरकरांनी देखील शुद्धी चळवळीचा खूप प्रचार आणि प्रसार केला होता. त्यामुळे स्वामीजींची हत्या झाली, तेव्हा सावरकरांना खूप वेदना झाल्या होत्या. डॉ. भीमराव आंबेडकर यांनी १९२२ मध्ये असे म्हटले होते की, श्रद्धानंद (Swami Shraddhanand) हे अस्पृश्यांचे “सर्वांत मोठे आणि खरे हितचिंतक” होते. स्वामी श्रद्धानंद संन्यास घेण्यापूर्वी वकिली करत होते. ते एक लोकप्रिय वकील होते. मात्र समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी संन्यास घेतला. त्यांनी स्वातंत्र्ययुद्धात देखील उडी घेतली होती.

महात्मा गांधी आफ्रिकेत असतांना केली मदत

जेव्हा स्वामीजींनी गुरुकुलाची स्थापना केली, तेव्हा महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आफ्रिकेत होते. स्वामी श्रद्धानंदजींनी गुरुकुलातील विद्यार्थ्यांकडून १५०० रुपये गोळा करून गांधीजींना पाठवले होते. गांधीजी आफ्रिकेतून भारतात परतले, तेव्हा त्यांनी श्रद्धानंदांची भेट घेतली. स्वामीजींच्या मृत्यूनंतर महात्माजींची प्रतिक्रिया हैराण करणारी आहे. स्वामीजींची हत्या करणार्‍या इस्लामी दहशतवाद्याला गांधीजींनी भाई म्हटले आहे.

(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या सहायक आयुक्त आणि उपायुक्तांनाही रस्त्यावर पिटाळणार)

स्वामी श्रद्धानंद यांची हत्या करणाऱ्याला गांधींचे समर्थन

२३ डिसेंबर १९२६ रोजी त्यांच्या नया बाजार येथील निवासस्थानी अब्दुल रशीद (Abdul Rasheed) नावाच्या एका इस्लामी जिहादी दहशतवाद्याने त्यांच्या खोलीत घुसून स्वामीजींची हत्या केली. स्वामीजींचे जगाच्या कल्याणाचे कार्य इस्लामी दहशतवाद्याला आवडले नाही. या घटनेबाबत गांधीजी म्हणाले, “मी अब्दुल रशीदला भाऊ म्हटले आणि मी पुन्हा तेच म्हणेन. मी त्याला स्वामीजींच्या हत्येसाठी दोषीही मानत नाही. खरे गुन्हेगार तेच आहेत, ज्यांनी एकमेकांबद्दल द्वेषाची भावना निर्माण केली. त्यामुळे दु:ख व्यक्त करण्याचा किंवा अश्रू ढाळण्याचा हा प्रसंग नाही.” (Swami Shraddhanand)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.