National Farmers Day : कृषीक्षेत्रात क्रांती घडवणारे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीदिनी साजरा होतो राष्ट्रीय शेतकरी दिन

200
National Farmers Day : कृषीक्षेत्रात क्रांती घडवणारे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीदिनी साजरा होतो राष्ट्रीय शेतकरी दिन
National Farmers Day : कृषीक्षेत्रात क्रांती घडवणारे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीदिनी साजरा होतो राष्ट्रीय शेतकरी दिन
भारतात दरवर्षी २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन (National Farmers Day) साजरा केला जातो. याच दिवशी भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग (Chaudhary Charan Singh) यांची जयंती देखील असते. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि ग्रामीण समृद्धीमध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा आहे. म्हणून, समाजातील योगदानाबद्दल देशभरातील शेतकऱ्यांचा सन्मान आणि कौतुक करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो.
लहान कार्यकाळतही शेतीसंबंधित क्रांती घडवली 
चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh) यांचा जन्म २३ डिसेंबर १९०२ रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील नूरपूर गावात एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. १९७९-१९८० दरम्यान ते भारताचे पंतप्रधान होते आणि त्यांनी शेतकर्‍यांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. त्यांनी अनेक कल्याणकारी योजना सुरु केल्या. १९३९ त्यांनी कर्जमुक्ती विधेयक आणले. पंतप्रधान म्हणून त्यांचा कार्यकाळ लहान असला तरी शेतीसंबंधित त्यांनी जणू क्रांतीच घडवून आणली होती. १९६२-६३ दरम्यान त्यांनी कृषी मंत्री (Minister of Agriculture) आणि वन मंत्री म्हणूनही सेवा दिली आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव करणारा दिवस
शेतकऱ्याला आपण अन्नदाता किंवा काळ्या मातीचा सुपुत्र असेही म्हणतो. (agriculture country) जगभर श्रीमंत असो की गरीब, नोकरदार असो वा उद्योगपती, प्रत्येकजण अन्नासाठी शेतकऱ्याच्या मेहनतीवर अवलंबून असतो. वर्षभर रात्रंदिवस, ऊन, पाऊस, थंडी याची पर्वा न करता शेतकरी आपल्या कष्टाने शेतात धान्य पिकवतो आणि संपूर्ण देशाची भूक भागवण्याचे काम करतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी शेतकरी दिन (National Farmers Day) साजरा केला जातो.
शेतकरी दिन भारतात २३ डिसेंबर रोजी साजरा केला जात असला तरी युनायटेड स्टेट्समध्ये १२ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. मात्र बळीराजाला विश्वासात घेऊन त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्याची आवश्यकता आहे. (National Farmers Day)
हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.