ओमायक्रॉनची धास्ती! केंद्राकडून महाराष्ट्राला ‘या’ महत्वाच्या सूचना!

66

कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन आढळल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली आहे. या व्हेरियंटचा संसर्ग झालेला पहिला रूग्ण दक्षिण आफ्रिकामध्ये आढळल्याचे समोर आले, त्यानंतर अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकन देशांवर प्रवास निर्बंध लादले आहेत. त्याचबरोबर भारत सरकारही सतर्क झाले असून ते टाळण्यासाठी पावले उचलत आहेत. देशात आतापर्यंत एकही प्रकरण समोर आले नसले तरी केंद्रापासून राज्यांची चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी या नव्या व्हेरियंटपासून बचाव करण्यासाठी विचारमंथन केले. बैठकीत त्यांनी राज्यांना काही विशेष उपाय सांगितले.

ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना काही निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारांना एक पत्र लिहून इशारा दिला आहे आणि महत्वाची माहिती देखील सांगितली असून सूचना केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, ओमायक्रॉन हा व्हेरियंट डेल्टापेक्षा तीनपट अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे राज्यात कोरोना चाचण्या वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी रुग्णालये सज्ज ठेवण्याच्या सूचना देखील दिल्या आहे.

(हेही वाचा – अमरावती हिंसाचाराला पोलिस उपायुक्त मकानदार कारणीभूत?)

केंद्राने दिल्या या महत्त्वाच्या सूचना

1. स्थानिक आणि जिल्हास्तरावर त्वरित निर्णय आणि कठोर कारवाईची केल्याने ओमायक्रॉनचा संसर्ग टळू शकतो

2. ज्या जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तेथे टेस्टिंग वाढवणे आवश्यक

3. ज्या जिल्हांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग वाढतोय तिथे रुग्णालयांमध्ये कोविड-19 शी संबंधित सर्व उपलब्ध सुविधांची खात्री करण्यात यावी.

4. गरजेनुसार स्थानिक पातळीवर रात्री कर्फ्यू सारखे निर्बंध देखील लावा. याशिवाय मेळाव्यावर बंदी आणा आणि लग्न सोहळ्यात लोकांची संख्या मर्यादित ठेवा

5. सर्व रुग्णालयातील पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि अधिसूचित आयसोलेशन झोन यांचाही लवकरात-लवकर आढावा घ्या.

6. सर्व पॉझिटिव्ह लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अनिवार्य

7. देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेसाठी डेल्टा जबाबदार असल्याचे मानले जात होते. त्यामुळे खबरदारी घ्या

8. सर्व राज्यांना लसीकरण वाढवून 100% लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करा

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.