अरे व्वा…जे.जे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिले १६० किलो वजनाच्या तरूणीला जीवनदान!

138

खासगी रुग्णालयाकडून अनेकदा हाय रिस्क (High Risk) शस्त्रक्रिया नाकारल्या जातात, आणि रुग्णांना सरकारी रुग्णालयात पुढील उपचार घेण्यास सूचित केले जाते. अशीच घटना मुंबईत अलिकडेच घडली असून, खासगी रुग्णालयाने नाकारलेल्या १६० किलो वजनाच्या ३४ वर्षीय तरूणीवर यशस्वी करून जे.जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या तरूणीला जीवनदान दिले आहे.

हृदयविकाराचा झटका

वांद्रे येथे राहणाऱ्या या ३४ वर्षीय तरूणीचे वजन तरूण वयातच १५० किलोवर पोहोचले होते. या तरुणीच्या आई-वडिलांचा पन्नाशीतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. वजन व आरोग्यदायी समस्यांमुळे संबंधित तरूणीलाही हृदय विकाराचा झटका आल्यावर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वजनामुळे हृदय शस्त्रक्रिया करण्यात धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सरकारी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.

( हेही वाचा : मुंबईमध्ये ‘या’ देशातून येणाऱ्यांना दिलासा! क्वारंटाईन, RTPCR टेस्टचं ‘नो टेन्शन’… )

यशस्वी शस्त्रक्रिया

संबंधित तरूणीने यानंतर जे.जे रुग्णालयात उपचार घेण्यास सुरूवात केली. कार्डियोलॉजी विभाग प्रमुख डॉक्टर कल्याण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्राध्यापक डॉ. शकिल शेख यांच्या नेतृत्वाखाली या तरुणीवर उपचार सुरू झाले. या तरूणीला दोन ब्लॉक होते. डॉ. शकिल शेख, डॉ. पियुष कलंत्री, परिचारीका अरुणा सबनीस व दिपाली या संपूर्ण टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली. तरूणीचे वजनामुळे स्ट्रेन टाकणे कठिण होते. पण आमच्या टीमने हे आव्हान पूर्ण केले आहे. असे डॉक्टर शेख यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.