गणेश विसर्जन स्थळांवर महापालिकेची जय्यत तयारी

87

श्री गणरायांचे आगमन बुधवारी ३१ ऑगस्ट रोजी होत असून गुरुवारी दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे दीड दिवसांसह अनंत चतुर्दशीच्या दिवसांपर्यंतच्या गणेश मूर्तींचे विसर्जन अनेक नैसर्गिक तसेच कृत्रिम तलावांच्या ठिकाणी होणार असल्याने या सर्व विसर्जन स्थळांच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने जय्यत करण्यात आली आहे.

( हेही वाचा : मुंबईत लेप्टो आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ)

यंदाच्या गणेशोत्सवासाठी व विशेष करुन श्रीगणेश मूर्ती विसर्जन व्यवस्थेसाठीचीही जय्यत तयारी महानगरपालिकेने केलेली आहे. ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणा-या श्री गणेशोत्सवा दरम्यान मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिस दल यांच्याद्वारे देण्यात येणा-या सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन उपायुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार यांनी मुंबई महानगरपालिकेद्वारे यानिमित्ताने पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

अशाप्रकारे आहे विसर्जन स्थळावरील महापालिकेची व्यवस्था

  • प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १८८ नियंत्रण कक्ष.
  • विसर्जन स्थळी ७८६ जीव रक्षक तैनात
  • नैसर्गिक विसर्जन स्थळी आवश्यक तेथे ४५ मोटार बोट व ३९ जर्मन तराफा व्यवस्था.
  • सुसमन्वय साधण्यासाठी प्रमुख विसर्जन स्थळी २११ स्वागत कक्ष.
  • अधिक चांगल्या प्रकाश व्यवस्थेसाठी ३ हजार ०६९ फ्लड लाईट व ७१ सर्च लाईट व्यवस्था.
  • महत्त्वाच्या विसर्जन स्थळी वैद्यकीय सामुग्रीसह सुसज्ज असणारे १८८ प्रथमोपचार केंद्र व ८३ रुग्णवाहिका.
  • निर्माल्यापासून खत बनविण्यासाठी निर्माल्य गोळा करण्यास उपयोगी ठरणारे ३५७ निर्माल्य कलश व २८७ निर्माल्य वाहने.
  • अधिक चांगल्या सुरक्षा व्यवस्थेसाठी ४८ निरिक्षण मनोरे व आवश्यक तेथे संरक्षक कठडे. –
  • महत्त्वाच्या विसर्जन स्थळी १३४ तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था.
  • श्रीगणेश मूर्ती विसर्जन ऑनलाईन नोंदणी सुविधा ही https://shreeganeshvirsarjan.com या संकेतस्थळावर उपलब्ध.
  • चौपाट्यांवर श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी येणा-या वाहनांची चाके वाळूमध्ये रुतू नयेत, यासाठी ४६० पौलादी प्लेटची व्यवस्था.
  • सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये कृत्रिम विसर्जन स्थळांची व्यवस्था.
  • मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सुमारे १० हजार अधिकारी व कर्मचारी यांना श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कार्यतत्पर राहण्याचे निर्देश
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.