राष्ट्रपती देश सोडून पळून गेल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर

94

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देश सोडून गेल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंकेत आणीबाणी घोषित केली असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. तर श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून आणीबाणी घोषित केल्याचे वृत्त राऊटर्स आणि एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे.

(हेही वाचा – रिया चक्रवर्तीने गांजा खरेदी करुन सुशांतला दिला, NCB चा मोठा खुलासा)

देशातून राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी मालदीवला पलायन केल्यानंतर काही वेळानंतर हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी संसद आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवला. यावेळी संतप्त श्रीलंकन जनतेने आपल्या हातात देशाचे झेंडे घेऊन मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांवर नियंत्रण मिळवणं आता कठीण झाल्याने श्रीलंकेत पुन्हा एकदा आणीबाणी जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, कोलंबोतील पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणावर जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंदोलकांनीही सैन्याचा सामना करण्यासाठी स्वतःच्या चेहऱ्यांवर विशिष्ट मास्क लावल्याचे दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी अखेर देश सोडला आहे. राष्ट्रपती राजपक्षे हवाई दलाच्या विमानाने देश सोडून निघून गेले आहे. राजपक्षे यांची पत्नी आणि दोन अंगरक्षकांसह मालदीवची राजधानी माले येथे दाखल झालेत. यावेळी वेलाना विमानतळावर मालदीव सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांचे स्वागत केल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.