भारतीय नौदलाचे Shivalik Ship सिंगापूरहून रवाना

143
भारतीय नौदलाचे Shivalik Ship सिंगापूरहून रवाना

आयएनएस शिवालिक (Shivalik Ship) हे दक्षिण चीन समुद्र आणि प्रशांत महासागरात तैनात करण्यात आलेले भारतीय नौदलाचे जहाज सिंगापूरहून जपानच्या योकोसुका येथे जाण्यासाठी निघाले. (Shivalik Ship)

सिंगापूर येथे जहाजाच्या थांब्यादरम्यान विविध उपक्रम हाती घेण्यात आले ज्यात चांगी नौदल तळावरील बेस कमांडर यांची भेट, क्रांजी युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करणे, सिंगापूरमधील भारताच्या उच्चायुक्तांशी भेट, आयएफसी भेट, जहाजावरील सुमारे ८० शाळकरी मुलांची आयएनएस शिवालिकला (Shivalik Ship) भेट भारतीय आणि ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांची जहाजावरील भेट तसेच युएसएस मोबाईल (LCS) ला क्रॉस-डेक भेटी यांचा समावेश होता. या भेटी प्रामुख्याने या क्षेत्रामध्ये सर्वांसाठी सुरक्षा आणि विकासच्या कक्षेत येणारे सागरी संबंध आणि नौदलांमधील सामायिक मूल्ये प्रतिबिंबित करतात. (Shivalik Ship)

(हेही वाचा – राज्यात महायुतीला ३०, महाविकास आघाडीला १८ जागा, दोन केंद्रीय मंत्री पराभूत; ‘हिंदुस्थान पोस्ट’चा Exit Poll)

आयएनएस शिवालिक (Shivalik Ship) सिंगापूरहून निघाल्यावर JIMEX २४ आणि RIMPAC २४ मध्ये सहभागी होणार आहे. या तैनातीचा उद्देश JMSDF, अमेरिकन नौदल आणि RIMPAC २४ मध्ये सहभागी होणाऱ्या इतर भागीदार नौदलांसोबत आंतरपरिचालन क्षमता वाढवणे हा आहे. (Shivalik Ship)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.