Shri Ram : कुशल संघटनाचा आदर्श!

हिंदु समाजाच्या दृष्टीने प्रभू श्रीरामाच्या या संघटनकार्याचे अध्ययन करणे आणि ते आचरणात आणणे आवश्यक आहे.

169
Shri Ram : कुशल संघटनाचा आदर्श!
Shri Ram : कुशल संघटनाचा आदर्श!
  • रमेश शिंदे 

या भूतलावर प्रभू श्रीरामासारखे सर्वार्थाने आदर्श तेच एकमेव! श्रीरामाने आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श सखा, आदर्श राजा, अशा प्रकारे अनेक आदर्श निर्माण केलेच, त्यासह श्रीरामाने केलेले कुशल संघटनकार्यही महत्वाचे आहे. अचानक उद्भवलेल्या वनवासकाळातील कठीण प्रसंगांतही अयोध्येतून कोणतेही सहाय्य न घेता, स्वतः वनातील विविध जमातीतील वीरांचे संघटन करून, असुरांचे निर्दालन करून त्या समस्यांचे निराकरण केले. वनवासाला निघताना श्रीराम, (Shri Ram) सीतामाता आणि लक्ष्मण असे तिघेच होते; मात्र रावणाचा वध करून अयोध्येला परत येताना ते लंकाविजयात सहाय्य करणा-या सेनेसह आले. त्यामुळे हिंदु समाजाच्या दृष्टीने प्रभू श्रीरामाच्या या संघटनकार्याचे अध्ययन करणे आणि ते आचरणात आणणे आवश्यक आहे.

वनवासात मित्र निषादराजाचे सहाय्य
महर्षी वसिष्ठ यांच्या गुरुकुलात असताना श्रीरामाची (Shri Ram) श्रृंगवेरपूरचा आदिवासी निषादराजा गुह याच्याशी घनिष्ट मैत्री होती. निषादराजाला श्रीराम वनवासात निघाले असल्याचे कळल्यावर त्याने प्रभू श्रीरामाला (Shri Ram) स्वतःचे राज्य देऊन तिथेच राहण्याची विनंती केली; मात्र श्रीरामाने (Shri Ram) वनवास धर्माचे पालनाचे कर्तव्य सांगून आता कोणत्याही नगरात प्रवेश करू शकत नसल्याचे सांगितले आणि त्याचे राज्य स्वीकारण्यास नकार दिला. त्याच्या राज्यातील वनात वृक्षाच्या खाली पानांची शेज बनवून श्रीरामाने (Shri Ram) आपली वनवासातील पहिली रात्र घालवली. निषादराजाने इतरही भरपूर मदत केली. निषादराजाने वनवासात केलेल्या या सहाय्याचा प्रभू श्रीरामाला (Shri Ram) विसर पडला नाही, तर लंकाविजय मिळवून परत येताना प्रभू श्रीरामाने पुष्पक विमान थांबवून निषादराजालाही राज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सोबत घेतले.

(हेही वाचा – Ramayan: आजही ‘रामायण’ देशामध्ये टिकून असल्याचे कारण काय? वाचा सविस्तर…)

श्रीरामाचे वनवासातील कार्य
वनवासकाळात श्रीरामाने (Shri Ram) विश्वामित्र, अत्री, अगस्ती आदी ऋषी-मुनींच्या आश्रमांना राक्षसांच्या त्रासापासून कायमचे मुक्त केले. साधारणपणे १२ वर्षे प्रभू श्रीराम वनवासात हे कार्य करत होते. याच काळात अत्याचारी राक्षसांच्या वधानंतर त्यांनी वनवासी समाजाला धनुष्य-बाण चालवण्याचे प्रशिक्षण देऊन शस्त्रविद्या शिकवली. या कार्यामुळे श्रीरामाला (Shri Ram) रावणाच्या विरोधात लढण्यासाठी वनातील सैन्याचे सहजपणे सहाय्य मिळाले.

रावणाचा बंधू बिभीषणाला आश्रय देणे
बिभीषण हा रावणाचा सर्वात लहान भाऊ होता. तो राक्षसकुळात जन्मलेला असला तरी, श्रीविष्णूचा परम भक्त होता. त्याने रावणाला राजदरबारातील चर्चेत सांगितले की, श्रीरामाला शरण जाऊन सीतामातेला श्रीरामाकडे सोपवण्यातच त्याचे हित आहे. त्यामुळे रागावून रावणाने बिभीषणाला राज्यातून बाहेर काढले. तेव्हा बिभीषण आश्रय मागण्यासाठी श्रीरामाकडे आला. शत्रूचा भाऊ आश्रय मागण्यासाठी आल्यावर त्याच्या हेतूची खात्री करणे आवश्यक होते. त्यामुळे श्रीरामाने (Shri Ram) सर्वप्रथम हनुमानाचे मत विचारले. तेव्हा हनुमानाने लंकेत बिभीषणाची झालेली भेट आणि त्याची भगवद्भक्तीची माहिती देऊन बिभीषणाला आश्रय देण्यास सांगितले. बिभीषण हा शत्रूपक्षातील सर्व प्रदेशांची, शस्त्रांची आणि असुरांच्या सैन्याची, शक्तीची रहस्ये असणारा सहकारी बनला. त्यामुळे युद्धात त्याने प्रभू श्रीरामाला प्रत्येक वेळी योग्य ती मदत करून त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला होता.

वनवासाची आज्ञा पाळणे खरे तर रावणाने सीताहरण केल्यानंतर प्रभूंनी जर अयोध्येतील सेना आणि भावंडांकडे सहाय्य मागितले असते, तर त्यांनी सहजपणे सहाय्य केले असते; मात्र वनवासात धनसंचय करायचा नसल्याने सैन्याचे वेतन, त्यांच्या युद्धसामग्रीचा खर्च, अन्न-धान्य हे पुरवता आले नसते. श्रीरामांनी वनातील वनवासी, वानरांशी जवळीक करून सहाय्य घेतले, त्यांचीच सेना उभारली. यातून प्रभूंनी सीतामातेची सुटका करण्याचा आदर्श पतीधर्माचे पालन तर केलेच, त्यासह पित्याच्या वचनाचा भंग होऊ न देता आदर्श पुत्रधर्माचेही पालन केले. याद्वारे प्रभूंनी वनवासातच कुशल संघटनाचा आदर्श घालून दिला. त्यामुळे आपणही अशा प्रकारे संघटन उभे केल्यास, संघटनातील प्रत्येकाच्या कौशल्याचा उपयोग करून घेतल्यास रामराज्यरूपी हिंदुराष्ट्र पुन्हा साकार करणे कठीण नाही.

(लेखक हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.