Shreya Ghoshal : श्रेया घोषाल हिच्या संगीतप्रवासाची सुरुवात कशी झाली तुम्हाला माहिती आहे का ?

182
Shreya Ghoshal : श्रेया घोषाल हिच्या संगीतप्रवासाची सुरुवात कशी झाली तुम्हाला माहिती आहे का ?
Shreya Ghoshal : श्रेया घोषाल हिच्या संगीतप्रवासाची सुरुवात कशी झाली तुम्हाला माहिती आहे का ?

गोड आवाजाची गायिका श्रेया घोषालचा (Shreya Ghoshal) आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने हा लेख…

श्रेया घोषालचा (Shreya Ghoshal) जन्म बंगाली कुटुंबात झाला. ती राजस्थानमधील कोटाजवळील रावतभाटा या छोट्याशा गावात लहानाची मोठी झाली. तिचे कौटुंबिक वातावरण अतिशय सुशिक्षित आहे. तिचे वडील भाभा अणु संशोधन केंद्रात अणुऊर्जा प्रकल्प अभियंता म्हणून भारतीय अणुऊर्जा महामंडळासाठी काम करत.

तिची आणि संगीताची ओळख अगदी लहानपणीच झाली. वयाच्या चौथ्या वर्षापासून ती तिच्या आईला हार्मोनियमवर साथ देऊ लागली. तिच्या पालकांनी तिला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या औपचारिक शिक्षणासाठी कोटा येथील महेशचंद्र शर्मा यांच्याकडे पाठवले. ती पहिल्यांदा प्रसिद्ध झाली झी टिव्हीवरील सारेगामा या कार्यक्रमामुळे. लहान मुलांच्या स्पर्धेची ती विजेता होती. त्यानंतर तिने अनेक कार्यक्रम केले.

पुढे एसआयईएस कॉलेजच्या कला शाखेतून तिने पदवी घेतली. तिने पुन्हा मोठ्यांच्या सारेगमप या स्पर्धेत भाग घेतला आणि या वेळी चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे लक्ष वेधून घेतले. २००० मध्ये, भन्साळींनी तिला देवदास चित्रपटात गाण्याची संधी दिली. ती ऐश्वर्या रायसाठी गायली. त्यानंतर मात्र ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचली. तिचे नाव कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, साधना सरगम असा दिग्गज गायिकांसोबत घेतले जाऊ लागले.

देवदाससाठी तिला फेल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर आर.डी. बर्मन पुरस्कार (RD Burman Award), राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. आज श्रेया घोषाल इंडस्ट्रीतील एक प्रमुख आणि सुप्रसिद्ध गायिका आहे. ती हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम, बंगाली, कन्नड, गुजराती, मेईती, मराठी आणि भोजपुरी यासह विविध प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गाते. अमूल स्टार व्हॉईस ऑफ इंडिया छोटे उस्ताद संगीत कार्यक्रमात ती परीक्षक म्हणूनही झळकली. अनेक भारतीय टीव्ही मालिकांसाठी तिने शीर्षकगीते गायली आहेत. (Shreya Ghoshal)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.