शिवप्रताप दिनावर ओमायक्रॉनचे सावट! प्रतापगडावर प्रवेश मिळणार का?

72

महाबळेश्वर तालुक्यामध्ये १० डिसेंबर रोजी प्रतापगडावर ‘शिवप्रताप दिन’ उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवासाठी नागरिक एकत्र येण्याची शक्यता असून, यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शिवप्रताप दिन अत्यंत साध्या पध्दतीने साजरा केला जाणार आहे. महाबळेश्वरच्या तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुषमा पाटील यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३ चे कलम १४४ मधील तरतूदीनुसार १० डिसेंबरसाठी विशेष आदेश जारी केले आहेत.

साध्या पध्दतीने उत्सव साजरा करणार

महाबळेश्वरमध्ये कोरोना रुग्ण आजही आढळून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या दोन वर्षांत आलेले सर्व धर्मीय सण व उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. त्यामुळे यावर्षी १० डिसेंबर  रोजी शिवप्रताप दिन उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. फक्त शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव साजरा करण्यात येईल.

नियमाचे अनुपालन करणे बंधनकारक

  • कोणत्याही प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, देखावे, प्रदर्शने इत्यादी आयोजित करण्यास सक्त मनाई आहे. नागरिक आकर्षित होऊन गर्दी होऊ नये याकरीता कोणत्याही प्रकारच्या जाहिरातीच्या प्रदर्शनास मनाई करण्यात येत आहे. या कार्यक्रम ठिकाणी गर्दी होणार नाही यांची आयोजकांनी खबरदारी घ्यावी.
  • शिवप्रतापदिन उत्सव साजरा करताना गर्दी होणार नाही तसेच तसेच ध्वनी प्रदूषणा संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.
  • उत्सवाच्या ठिकाणी थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. तसेच स्वच्छतेचे नियम, मास्क, सॅनिटायझर इत्यादी नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. सदर कार्यक्रमास उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे कोविड -१९ लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.

( हेही वाचा : ठाणे स्मार्ट सिटी योजनेत भ्रष्टाचार! केंद्र सरकारकडून होणार चौकशी! )

….तर कारवाई होणार

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांच्या विरुद्ध यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१, भारतीय साथरोग अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार दंडनीय/कायदेशीर कारवाई, पोलिस कर्मचाऱ्यांनी करावी, असेही आदेशात या नमूद करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.