Share Market : भाजपच्या विजयाचा परिणाम शेअर बाजारावर, जाणून घ्या कोणते शेअर्स आहेत तेजीत

123
Share Market : भाजपच्या विजयाचा परिणाम शेअर बाजारावर, जाणून घ्या कोणते शेअर्स आहेत तेजीत
Share Market : भाजपच्या विजयाचा परिणाम शेअर बाजारावर, जाणून घ्या कोणते शेअर्स आहेत तेजीत

तीन राज्यांत पूर्ण बहुमतासह भाजपचा विजय आणि जागतिक बाजारातून मिळालेले सकारात्मक संकेत याचा परिणाम सोमवारी (4 डिसेंबर) देशांतर्गत शेअर बाजारांवर दिसून आला आहे.शेअर बाजारात पैसा गुंतवणारे आतुरतेने विधानसभा निवडणुकीच्या निकालांची प्रतीक्षा करत होते. अशा परिस्थितीत, विधानसभा निवडणुकीत भाजपच्या या मोठया विजयाचा परिणाम नवीन आठवड्यात शेअर बाजारावरही दिसून येत आहे. जाणून घेऊयात कोणते शेअर्स आहेत फॉर्म मध्ये. (Share Market )

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते
मोमेंटम इंडिकेटर मूव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स (MACD) ने REC, लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, PNB, बँक ऑफ इंडिया आणि अपोलो टायर्सच्या शेअर्समध्ये तेजीचा कल दर्शवला आहे. तसेच NTPC, ॲक्सिस बँक, L&T, अपोलो हॉस्पिटल, बजाज फिनसर्व्ह, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि BPCL या शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून येत असून या शेअर्सनी ५२ आठवड्यांचा उच्चांक ओलांडला आहे. (Share Market )

(हेही वाचा : Alandi : देवस्थानच्या विश्वस्त पदावरून स्थानिकांना डावल्याने आळंदी बंद)

कोणत्या शेअर्समध्ये मंदीचे सत्र
त्याचप्रमाणे MACD ने IRB इन्फ्रा डेव्हलपर्स, देवयानी इंटरनॅशनल, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, अजंता फार्मा, EIH आणि Eris Lifesciences च्या शेअर्समध्ये मंदीचे संकेत दिले आहेत म्हणजे आता या शेअर्समध्ये पडझड होऊ शकते. उल्लेखनीय आहे की गेल्या आठवड्यात शुक्रवारी, कोणत्याही मोठ्या शेअरने नीचांक नोंदवला नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.