75th Republic Day : हिंदुस्थानच्या प्रजासत्ताकाची पंचाहत्तरी

हिंदू समाजात फूट पाडण्यासाठी हिंदूंना जाती जातीत विभागण्यात आले. आजही तो प्रकार तसाच चालू आहे. लोकशाही प्रजासत्ताक राज्यपद्धती स्वीकारून सुद्धा देशातील बहुसंख्य असलेला हिंदू समाज पोरका झाला, अनाथ झाला. लोकशाही धोक्यात आणणारा देशातला सर्वात मोठा समाज म्हणजे हिंदू समाज आहे असा समज जाणीवपूर्वक करून देण्यात आला.

168
75th Republic Day : हिंदुस्थानच्या प्रजासत्ताकाची पंचाहत्तरी

दुर्गेश जयवंत परुळकर
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी ब्रिटिशांची सत्ता उलथून आपण स्वतंत्र झालो. या स्वातंत्र्याचा आनंद आपल्याला उपभोगता आला नाही; कारण आपल्या देशाची फाळणी झाली. एक शत्रूराष्ट्र निर्माण झाले. स्वातंत्र्यापूर्वी मुसलमान समाजाने मुसलमान हे एक स्वतंत्र राष्ट्र असल्याचे घोषित केले. या घोषणेतून त्यांनी स्वतःची पृथकता व्यक्त केली. त्यांच्या या पृथकतेला खतपाणी घालण्यात आले. त्यांच्या इच्छापूर्तीसाठी देशाचे विभाजन स्वीकारले. ज्यांनी मुसलमानांसाठी स्वतंत्र राष्ट्र हवे अशी मागणी केली या मागणीला पाठिंबा दर्शवला. त्यातले अनेक जण पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर पाकिस्तानात गेले नाहीत. आपल्या देशातल्या सर्वधर्मसमभाव या अर्थहीन कल्पनेला प्राधान्य देऊन त्यांना संतुष्ट करण्यासाठी विविध प्रकारच्या तरतुदी घटनेत करण्यात आल्या.‌ त्यासाठी देशाच्या सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक परंपरा कस्पटासमान लेखण्यात आल्या. परिणामी राष्ट्रभावना देशात निर्माण होऊ शकली नाही. (75th Republic Day)
हिंदुस्थान हा देश राष्ट्रच नाही असा आभास निर्माण करण्यात आला. त्याला सडेतोड उत्तर देऊन आपले राष्ट्रीयत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न नेहरूंकडून झाला नाही. हिंदू धर्माचे खच्चीकरण आणि ख्रिश्चन, मुस्लिम धर्माचा उदो उदो करण्यातच आनंद मानण्यात आला.‌ हिंदू समाजात फूट पाडण्यासाठी हिंदूंना जाती जातीत विभागण्यात आले. आजही तो प्रकार तसाच चालू आहे. लोकशाही प्रजासत्ताक राज्यपद्धती स्वीकारून सुद्धा देशातील बहुसंख्य असलेला हिंदू समाज पोरका झाला, अनाथ झाला. लोकशाही धोक्यात आणणारा देशातला सर्वात मोठा समाज म्हणजे हिंदू समाज आहे असा समज जाणीवपूर्वक करून देण्यात आला.

मुसलमान आणि ख्रिश्चन समाजाला अल्पसंख्य ठरवून त्यांना वाजवीपेक्षा जास्त स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. त्यांच्या विभाजक वृत्तीला पोषक वातावरण निर्माण करण्याचे काम समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने केले. त्याचे घातक परिणाम आजही आपल्याला भोगावे लागत आहेत. ख्रिश्चन आणि मुसलमान धर्माच्या लोकांना त्यांच्या त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्याची पूर्ण मुभा शिक्षण व्यवस्थेतून देण्यात आली. त्यासाठी सर्वधर्मसमभाव हा राग आळवला गेला. त्याचवेळी हिंदू समाजाच्या शिक्षण संस्थांमधून हिंदू धर्माचे शिक्षण देता येणार नाही, असे बंधन घालण्यात आले. असा पक्षपातीपणा म्हणजेच सर्वधर्मसमभाव आणि निधर्मीवाद असे समीकरण जनमानसावर ठसवण्यात आले.‌ राष्ट्राच्या उत्कर्षाचा, राष्ट्रातील समाज संघटनेचा, राष्ट्र जगात प्रबळ व्हावे या दृष्टीने विचार करायचा नाही हेच राष्ट्रीय धोरण ठरले.
परिणामी देशात बॉम्बस्फोटांच्या मालिका होऊ लागल्या. दंगली, जाळपोळ यांना मोकळे मैदान मिळाले. फुटीरतेला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळेच संसदेवर हल्ला करण्यापर्यंत अल्पसंख्य समाजाची मजल गेली. हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य करण्यात आले. मशिदीत शस्त्राचा साठा होऊ लागला. सैन्य दलावर दगडफेक होऊ लागली. सैन्य दलाला बदनाम करण्याची जणू मोहीमच काढली गेली. काँग्रेस सरकारने तर सैनिकांना अतिरेक्यांना बिर्याणीची ताटे देण्यासाठी बाध्य केले. अतिरेक्यांना गोळ्या घालण्याऐवजी बिर्याणीचे जेवण देण्यात आले. यामागे सैन्याचे मनोबल नष्ट करणे आणि अतिरेक्यांचे मनोबल पुष्ट करणे हाच हेतू होता.

विचित्र परिस्थितीतून देश मार्गक्रमण करत होता. त्यात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला. काश्मीरमधल्या हिंदू पंडितांना परागंदा व्हावे लागले. दहशतवादामुळे कश्मीरमधल्या हिंदू तरुणींची मासिक पाळी वयाच्या तिशीच्या आत बंद झाली. एवढे भयंकर परिणाम हिंदू समाजावर होत होते.या सर्वाला आळा घालण्याचा प्रयत्न वर्ष २०१४ नंतर सुरू झाला.‌ कलम ३७० आणि ३५ अ घटनेतून काढून टाकण्यात आले. फुटीरतावाद्यांना विदेशातून होत असलेली आर्थिक मदत बंद करण्यात आली.‌ पाकिस्तान आणि चीन सारख्या राष्ट्रावर वचक बसवण्यात देशाला यश मिळाले.‌ आर्थिक आणि शस्त्र बळाच्या दृष्टीने आपला देश समर्थ बनला.‌ देश प्रगतीपथावरून वाटचाल करू लागला. सर्वधर्मसमभावाच्या आणि निधर्मीवादाच्या नावाने सुरू असलेल्या राष्ट्रघातकी कृत्यांना शह देण्यात आला. मुसलमानांनी अवैध मार्गाने बळकावलेली भूमी वैध मार्गाने पुनश्च मिळवण्याचा मार्ग मोकळा होऊ लागला. हिंदूंची मंदिरे हिंदूंच्या हाती पडण्याचा मार्ग खुला झाला.

(हेही वाचा : Republic Day 2024 : २६ जानेवारीला ३५० किल्ल्यांवर फडकणार तिरंगा आणि भगवा ध्वज)

आपला देश हा हिंदूंचा आहे. या देशाची परंपरा हिंदूंची आहे. अन्य धर्मियांनी या देशात सुखाने नांदावे. त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याची मुभा आहे. त्यासाठी मात्र त्यांना या देशाची परंपरा, या देशाचे राष्ट्रगीत, या देशाचा ध्वज यांचा सन्मान करणे बंधनकारक आहे. या देशाच्या राष्ट्रपुरुषांविषयी श्रद्धा भाव आदरभाव बाळगणे सर्वांनाच बंधनकारक आहे. असे निर्बंध अस्तित्वात येणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय संपत्तीची हानी करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला राष्ट्रद्रोही ठरवले जाईल असा निर्बंध या देशात निर्माण झाला पाहिजे. हे प्रजासत्ताक राज्य आहे, इथे प्रजेची सत्ता चालेल. निवडून आलेल्या प्रतिनिधींनी स्वतःला देशाचे मालक समजू नये. देशाचे ते सेवक आहेत. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करण्याचा अधिकार घटनेने कोणालाही दिला नाही.‌ याचे जाणिवेसह पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.‌ या देशातला प्रत्येक नागरिक भारतीय आहे हीच त्याची ओळख राहील. कोणालाही कोणत्याही प्रकारे आपल्या धर्माचा वा जातीचा उल्लेख करता येणार नाही. असे बंधन घालण्यात आले पाहिजे. या देशाचा अधिकृत धर्म या भूमीत जो अनंत काळापासून चालत आला आहे तोच असेल. तसेच अनंत काळापासून या देशात चालत आलेली ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा आहे तीच या देशातल्या प्रत्येक नागरिकाची परंपरा असेल. या परंपरेशी एकनिष्ठ राहूनच प्रत्येकाला राष्ट्रीय जीवनात सहभाग घ्यावा लागेल. अशी कठोर बंधने घालून ती काटेकोरपणे पाळली तरच आपली लोकशाही आणि आपले प्रजासत्ताक राज्य सुरक्षित राहील तसेच स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वही अबाधित राहील. हिंदुस्थानच्या प्रजासत्ताकाची ही पंचाहत्तरी अशी कात टाकून चैतन्यमय झालेली जगाच्या दृष्टीला पडली पाहिजे. तसे घडले तर आपला देश विश्वगुरू पदावर विराजमान झालेला पाहून आपले सारे पूर्वज धन्य होतील.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.