Rukmini Devi : ’साधीर’ या नृत्यप्रकाराला ’अश्लील’ मानले जायचे, पण ’या’ नर्तकीने मिळवून दिला सन्मान!

579
Rukmini Devi : ’साधीर’ या नृत्यप्रकाराला ’अश्लील’ मानले जायचे, पण ’या’ नर्तकीने मिळवून दिला सन्मान!
Rukmini Devi : ’साधीर’ या नृत्यप्रकाराला ’अश्लील’ मानले जायचे, पण ’या’ नर्तकीने मिळवून दिला सन्मान!
रुक्मिणी देवी (Rukmini Devi) हे नाव शास्त्रीय नृत्याच्या क्षेत्रात खूपच प्रसिद्ध आहे. त्यांनी आयुष्यभर नृत्य-साधना केली. त्यांचा जन्म तामिळनाडू येथील मदुराई येथे  २९ फेब्रुवारी १९०४ साली एका ब्राह्मण कुटुंबात झाला. रुक्मिणी देवी या भारतीय शास्त्रीय संगीतातील भरतनाट्यम या नृत्यप्रकाराच्या नर्तकी आणि नृत्य दिग्दर्शिका होत्या. त्या राज्यसभेत सदस्या असणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. (Rukmini Devi)
रुक्मिणी देवी (Rukmini Devi) यांचे वडील इंजिनिअर होते. ते पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट (Public Works Department) मध्ये काम करायचे. त्यानंतर १९०१ साली ते थिओसोफिकल सोसायटीशी जोडले गेले. त्यानंतर पुढे त्या थिओसोफिकल सोसायटीचे प्रेसिडेंट झाले. पुढे रुक्मिणी देवी यांनी ब्रिटिश थिओसोफिस्ट (British Theosophist) अरुंदल यांच्याही लग्न केलं तेव्हा त्यांचं वय सोळा वर्षे होतं आणि त्यांच्या पतीचं वय सव्वीस वर्ष होतं. त्याकाळच्या समाजाला त्यांचं लग्न काही फार पटलं नव्हतं, खरंतर त्या काळी त्या लोकांना धक्काच बसला होता. लग्नानंतर दांपत्याला जगभरात प्रवास करण्याचा योग आला. प्रवासादरम्यान ते आपल्या इतर सहकारी थिओसोफिस्ट्सना भेटले. (Rukmini Devi)
१९२३ साली रुक्मिणी देवी (Rukmini Devi) ऑल इंडिया फेडरेशन ऑफ यंग जनरेशन थिओसॉफीस्टच्या (Young Generation Theosophists) अध्यक्ष झाल्या. त्यानंतर लगेचच दोन वर्षांत १९२५ साली वर्ल्ड फेडरेशन ऑफ यंग जनरेशन थिओसोफीस्टच्या (Young Generation Theosophists) सदस्य देखील झाल्या.
१९२८ साली रशियाच्या प्रसिद्ध नृत्यांगना ऍना पवलोव्हा या भारतात मुंबई येथे आपल्या शो साठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांचे सादरीकरण पाहण्यासाठी अरुंदल दांपत्य गेले. एवढेच नाही, त्यांना त्यांचे सादरीकरण एवढे आवडले की, त्या नृत्यांगना त्यांच्या पुढच्या शो साठी जहाजाने ऑस्ट्रेलियाला जाणार होत्या. तिथेही हे दांपत्य त्यांच्याच जहाजाने गेले. प्रवासादरम्यान ऍना आणि अरुंदल दांपत्याची खूप छान मैत्री झाली होती. तिथून परत आल्यावर रुक्मिणी देवींनी (Rukmini Devi) आयुष्यभर भारतातील प्राचीन नृत्यकलांचा शोध घेण्याचं ठरवलं आणि त्यानुसार त्या काम करायला लागल्या. त्यांनी भारतीय कलेला पुनरुज्जीवन देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. (Rukmini Devi)
भरतनाट्यममध्ये ’साधीर’ (sadhir) नावाचा एक प्रकार आहे, जो पूर्वी अश्लील मानला जायचा. पण रुक्मिणी देवी (Rukmini Devi) यांनी साधीर (sadhir) या नृत्यप्रकारात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आणि हा प्रकार सर्व जनसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न केले. १९५६ साली रुक्मिणी देवींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तसंच त्यांना १९६७ साली संगीत नाटक अकादमीचा फेलोशिप पुरस्कारही देण्यात आला. (Rukmini Devi)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.