Ritesh Deshmukh : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा झाला विनोदाचा सम्राट

259
Ritesh Deshmukh : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा झाला विनोदाचा सम्राट
Ritesh Deshmukh : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा झाला विनोदाचा सम्राट

महाराष्ट्राचे देखणे मुख्यमंत्री म्हणजे कै. विलासराव देशमुख. रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) हा विलासरावांचा मुलगा. रितेश देशमुखचा जन्म १७ डिसेंबर १९७८ रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील विलासराव देशमुख १९९९ ते २००८ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. रितेश देशमुख मुंबईतील जीडी सोमाणी मेमोरियल स्कूलमध्ये शिकला. मुंबईच्या कमला रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून आर्किटेक्चरची पदवी मिळवली. त्याने ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी न्यूयॉर्क गाठले.

रितेशने २००३ मध्ये जेनेलिया डिसूझाच्या सोबत तुझे मेरी कसम या प्रेम चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नंतर तो आऊट ऑफ कंट्रोलमध्ये दिसला. मस्तीमधल्या विनोदी भूमिकेमुळे तो नावारुपाला आला. त्यानंतर तो बर्दाश्त आणि नाचमध्ये दिसला. क्या कूल है हम या चित्रपटातील त्याची भूमिका खूपच लोकप्रिय ठरली. त्यानंतर रितेशने अनेक विनोदी चित्रपटांमध्ये काम केले आणि एक विनोदी अभिनेता म्हणून नाव कमावले.

(हेही वाचा-JN.1 case : कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू ; केरळ अलर्ट मोडवर)

एक विलेन सारख्या चित्रपटातून त्याने खलनायकाची भूमिका साकारली. त्याचबरोबर लई भारी, वेड हे मराठी चित्रपट देखील यशस्वी ठरले. रितेशने वेगवेगळ्या भूमिका केल्या असल्या तरी त्याला विनोदी कलाकार म्हणून मान्यता मिळाली आहे. रितेशने २०१३ मध्ये मुंबई फिल्म कंपनी नावाची निर्मिती संस्था स्थापन केली. बालक पालक, फास्टर फेणे असे यशस्वी चित्रपट त्याने निर्माता म्हणून दिले आहेत. वेड चित्रपटाचे त्याने दिग्दर्शनही केले आहे आणि पटकथाही त्याने लिहिली. हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांच्या चित्रपटांमध्ये त्याने यश मिळवले आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.