veg restaurants : शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर ‘या’ हॉटेल्सला नक्की भेट द्या

जर तुम्हाला शहराच्या मध्यभागी पंजाबी ढाब्याचा अनुभव घ्यायचा असेल तर 'ओय काके' या हॉटेलला नक्की भेट द्या. छोले भटूरेपासून ते अनेक चवदार लस्सीपर्यंत, तुम्हाला पंजाबी पदार्थांचा आस्वाद घेता येतो.

142
Restaurants With Vegetarian Food For Groups : शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर 'या' हॉटेल्सला नक्की भेट द्या

आपण अशा देशात राहतो जिथे सुमारे 28% लोकसंख्या ही शाकाहारी आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला जुन्या पारंपरिक रेस्टॉरंटपासून ते आधुनिक रेस्टॉरंटपर्यंत, मुंबईतील 10 सर्वोत्तम शाकाहारी रेस्टॉरंटची माहिती देत आहोत. तसेच आम्ही शाकाहारी ‘अनुकूल’ उपहारगृहांबद्दल बोलत नाही आहोत; तर पूर्णपणे शुद्ध शाकाहारी हॉटेल्सची आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. (Restaurants With Vegetarian Food For Groups)

(हेही वाचा – Madhubala: निखळ सौंदर्य, अदाकारी आणि सहजसुंदर अभिनय!)

१. बर्मा बर्मा रेस्टॉरंट आणि टी रूम (Burma Burma restaurant & tea room)

नावाप्रमाणेच, शहरातील मोजक्या हॉटेल्सपैकी हे एक हॉटेल आहे. जे तुम्हाला आनंददायी वातावरणात अस्सल बर्मी खाद्यपदार्थचा आस्वाद देते. या हॉटेलमध्ये गेल्यावर काळा चहा किंवा ऊलोंग चहाचे भांडे मागवायला विसरू नका. (Restaurants With Vegetarian Food For Groups)

दोघांसाठी अंदाजे खर्च : १,५०० रुपये
कुठेः फोर्ट

२. वेज (Vedge)

भारतीय आणि जागतिक अशा दोन्ही प्रकारच्या पाककृतींचा मेनू असलेले वेज हे अनेक शाकाहारी कुटुंबांसाठी भेट देण्याजोगे ठिकाण आहे. तुम्ही विविध प्रकारच्या थाय, चिनी, उत्तर भारतीय, मेक्सिकन आणि इटालियन खाद्यपदार्थांमधून निवडू शकता. अगदी मिरची लसूण ऑयस्टर सॉसमध्ये टाकलेल्या पनीरपासून ते पान सुपारी मार्टिनीपर्यंतपदार्थांचा पर्याय उपलब्ध आहे. (Restaurants With Vegetarian Food For Groups)

दोघांसाठी अंदाजे खर्च : १००० रुपये
कुठेः अंधेरी

(हेही वाचा – WFI Row : जागतिक कुस्ती फेडरेशनने भारतीय संघटनेवरील बंदी तातडीने हटवली)

३. ओय काके (Oye Kake)

जर तुम्हाला शहराच्या मध्यभागी पंजाबी ढाब्याचा अनुभव घ्यायचा असेल तर ‘ओय काके’ या हॉटेलला नक्की भेट द्या. छोले भटूरेपासून ते अनेक चवदार लस्सीपर्यंत, तुम्हाला पंजाबी पदार्थांचा आस्वाद घेता येतो. तसेच त्यांची ‘स्पेशल काके’ थाळी हे प्रमुख आकर्षण आहे.(Restaurants With Vegetarian Food For Groups)

दोघांसाठी अंदाजे खर्च : ८०० खर्च
कुठे : लोअर परळ आणि फोर्ट

४. स्टेटस वेज रेस्टॉरंट (Status Veg Restaurant)

दक्षिण मुंबईतील हे एक प्रसिद्ध शाकाहारी उपाहारगृह आहे. इथे तुम्हाला दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय आणि गुजराती खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. जर तुम्ही नाश्त्यासाठी जात असाल, तर तिथला घी म्हैसूर मसाला डोसा नक्की ट्राय करा. त्यांच्याकडे मलाई कुल्फीपासून गुलाब जामुनपर्यंतच्या काही पारंपरिक मिष्टान्नांचे पर्यायही आहेत. (Restaurants With Vegetarian Food For Groups)

दोघांसाठी अंदाजे खर्च : ८०० रुपये
कुठे : नरिमन पॉईंट

(हेही वाचा – State Reserve Police Force : राज्य राखीव पोलीस दलात कसे सामील व्हावे, जाणून घ्या…)

५. गोविंदास रेस्टॉरंट (Govinda’s restaurant)

गोविंदास रेस्टॉरंटचे वातावरण बऱ्यापैकी साधे आणि जुने असले तरी, तिथल्या जेवणावरून तुमचे लक्ष हटत नाही. येथे स्ट्रॉबेरी ढोकला, पनीर काली मिर्च सारख्या भाज्या, डाळी, ब्रेड यासारख्या मिष्टान्नांचा पर्याय उपलब्ध आहे. (Restaurants With Vegetarian Food For Groups)

दोघांसाठी अंदाजे खर्च : ९०० रुपये
कुठेः जुहू

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.