RBI Action on Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेचा दणका; ठोठावला ‘इतक्या’ कोटींचा दंड, पण का?

76
RBI Action on Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेचा दणका; ठोठावला 'इतक्या' कोटींचा दंड, पण का?

भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पेटीएम पेमेंट्स बँकवर 5.39 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

गुरुवार 12 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात केंद्रीय बँकेने (RBI Action on Paytm Payments Bank) म्हटले आहे की, ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (केवायसी) निर्देश, 2016’, ‘आरबीआय पेमेंट बँकांच्या परवान्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे’ ‘दिवसाच्या शेवटी जास्तीत जास्त शिल्लक वाढवणे’, ‘बँकांमधील सायबर सुरक्षा चौकट’ ‘असामान्य सायबर सुरक्षा घटनांच्या अहवालावरील मार्गदर्शक तत्त्वे’ आणि ‘यूपीआय इकोसिस्टमसह मोबाइल बँकिंग अॅप्लिकेशन्स सुरक्षित करणे’ या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल नियामकाने पेटीएम पेमेंट्स बँकवर कारवाई करत एकूण ५.३९ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

(हेही वाचा – Operation Ajay : एकूण २१२ जणांची पहिली तुकडी भारतात दाखल)

आरबीआयने आपल्या निवेदनात (RBI Action on Paytm Payments Bank) म्हटले आहे की, बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 47 ए (1) (सी) आणि कलम 46 (4) (आय) च्या तरतुदींनुसार आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

RBI कडून पेटीएम पेमेंट्स बँकेला कारणे दाखवा नोटीस

आरबीआयने निवेदनात म्हटलं आहे की, बँकेनं पेमेंट ट्रांजेक्शन्सचं (RBI Action on Paytm Payments Bank) परीक्षण केलेलं नाही आणि पेमेंट सर्विसेजचा फायदा घेत असलेल्या संस्थांच्या जोखमीचं मूल्यांकनही केलेलं नाही. रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे की, “Paytm पेमेंट्स बँकेनं पेमेंट सेवांचा लाभ घेत असलेल्या काही ग्राहकांच्या आगाऊ खात्यांमध्ये दिवसाच्या शेवटच्या शिल्लक रकमेच्या नियामक मर्यादेचं उल्लंघन केलेलं आहे.” यानंतर बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.