Rajpal Singh Sirohi : जर्मनीतील ओल्डनबर्ग युनिव्हर्सिटीकडून सन्मान झालेले ‘हे’ भारतीय भौतिक शास्त्रज्ञ तुम्हाला माहिती आहेत का ?

Rajpal Singh Sirohi : आतापर्यंत राजपाल सिंह सिरोही यांनी जवळजवळ ४३० शोधनिबंध आणि अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

127
Rajpal Singh Sirohi : जर्मनीतील ओल्डनबर्ग युनिव्हर्सिटीकडून सन्मान झालेले 'हे' भारतीय भौतिक शास्त्रज्ञ तुम्हाला माहिती आहेत का ?
Rajpal Singh Sirohi : जर्मनीतील ओल्डनबर्ग युनिव्हर्सिटीकडून सन्मान झालेले 'हे' भारतीय भौतिक शास्त्रज्ञ तुम्हाला माहिती आहेत का ?

राजपाल सिंह सिरोही (Rajpal Singh Sirohi) हे एक भारतीय शिक्षक, भौतिक शास्त्रज्ञ, शैक्षणिक प्रशासक आणि ऑप्टिकल मेट्रोलॉजीमधले संशोधक आहेत. तसेच ते आयआयटी दिल्ली (IIT Delhi) इथले माजी संचालक आहेत. त्याचबरोबर अनेक युनिव्हर्सिटीचे कुलगुरूही राहिले आहेत.

आतापर्यंत राजपाल सिंह सिरोही यांनी जवळजवळ ४३० शोधनिबंध आणि अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. याव्यतिरिक्त त्यांना आयसीओचा गॅलिलिओ पुरस्कार (Galileo Prize) आणि एसपीआयइचा गॅबर पुरस्कारही देण्यात आला आहे. तसेच इतर अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

(हेही वाचा – Prashant Thakur : भाजपा सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणारा पक्ष; आमदार प्रशांत ठाकूर)

दिल्ली आयआयटीतून पोस्ट एमएससी डिप्लोमा आणि पीएचडी

राजपाल सिंह सिरोही यांचा जन्म ७ एप्रिल १९४३ साली उत्तर प्रदेशातील बुलंदशहर नावाच्या जिल्ह्यात सेहरा नावाच्या गावामध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. इयत्ता तिसरीपर्यंत राजपाल सिंह सिरोही हे त्यांच्याच गावातल्या शाळेत शिकले. मग पुढे चौथी आणि पाचवीचं शिक्षण भवन बहादूर नगर येथील शाळेत घेतलं.

त्यानंतर त्यांनी भवन बहादूर नगर येथील एसीबी इंटर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. मग पुढे त्यांनी मेरठ येथील एन.ए.एस. कॉलेजमधून बीएससी आणि त्यानंतर फिजिक्स या विषयात एमएससी केलं. पुढे त्यांनी दिल्लीला जाऊन आयआयटी येथून पोस्ट एमएससी डिप्लोमा आणि पीएचडी शिक्षण पूर्ण केलं.

जर्मनीतील ओल्डनबर्ग युनिव्हर्सिटीकडून सन्मान

राजपाल सिंह सिरोही (Rajpal Singh Sirohi) यांनी भारतातील बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे सायंटिफिक ऑफिसर म्हणून काम केलं होतं. तसंच मद्रास म्हणजेच आताच्या तामिळनाडूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी सहाय्यक प्रोफेसर आणि प्रोफेसर म्हणून कामं केलं आहे. याव्यतिरिक्त ते सिंगापूर येथील नॅशनल युनिव्हर्सिटीचे व्हिजिटिंग प्रोफेसरही होते. तसेच जर्मनीतील ओल्डनबर्ग युनिव्हर्सिटीने (University of Oldenburg) राजपाल सिंह सिरोही यांना अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट (Alexander von Humboldt) नावाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.