बुधवारी जोरदार सरींसह मुंबईत अतिवृष्टीचा इशारा!

100

रात्रभर मुसळधार कोसळळेल्या पावसाने मुंबईत सलग दुस-या दिवशी जनजीवन विस्कळीत केले. मुंबईत बहुतांश ठिकाणी सकाळच्या नोंदीत दीडशे ते दोनशे मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारीही मुंबईत दिवसभर सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस राहील. काही ठराविक भागांत जोरदार सरींसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बहुतांश भागांत ६४ ते ११५.४ मिमी पाऊस दिवसभरात होईल. अतिवृष्टीची शक्यता असलेल्या भागांत २०४.५ मिलीमीटरपर्यंत पावसाची अंदाज वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचा – आषाढी वारीसाठी रेल्वेकडून ‘या’ विशेष गाड्यांची सुविधा)

सकाळी साडेआठच्या नोंदीत वांद्रे येथे १९१ मिमी, जुहू परिसर १५४ मिमी, मुंबई विमानतळ परिसरात २०४.५ मिमी, राम मंदिर येथे १७२ मिमी, चेंबूर येथील टाटा पॉवर परिसरात १४४.५ मिमी, विद्याविहार येथे १९७.५ मिमी, भायखळा येथे  १३३ मिमी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ५७ मिमी महालक्ष्मी येथे ९८ मिमी, सायन येथे १९४ मिमी पावसाची नोंद झाली. सततच्या पावसाच्या मा-यामुळे मुंबईत आता कमाल आणि किमान तापमानात केवळ ३ ते ४ अंशापर्यंतच फरक आढळून आला. मुंबईत मंगळवारीच कमाल तापमानात तीन ते चार अंशाने घट नोंदवली गेली. बहुतांश परिसरात कमाल तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले होते.

कमाल तापमान ४ अंशाने कमी

गेल्या दहा वर्षांतील सरासरीच्या तुलनेत कमाल तापमान ४ अंशाने कमी झाले होते. मुंबई विमानतळ परिसरात कमाल तापमान २४ अंशापर्यंत खाली उतरण्याची विक्रमी नोंद झाली. बुधवारी सकाळी किमान तापमानातही विक्रम नोंदवला गेला. पावसाच्या मा-याने मुंबईभरात किमान तापमान २४ ते २७ अंश सेल्सिअशपर्यंत नोंदवले गेले. चेंबूर येथील टाटा पॉवर परिसरात किमान तापमान २४.१ हे दिवसभरातील किमान तापमानाची नीच्चांकी तापमानाची नोंद झाली. विक्रोळीत २७.१ हे मुंबईभरातील बुधवारच्या नोंदीतील उच्चांकी किमान तापमान झाल्याचे स्वयंचलित केंद्रातील नोंदीतून आढळले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.