Nashik : नाशिक जिल्ह्यात धरणांमधून पाण्याचा विसर्ग, १७ गावांना सतर्कतेचा इशारा

ओव्हरफ्लो झालेले धारणातील पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे

113
Nashik : नाशिक जिल्ह्यात धरणांमधून पाण्याचा विसर्ग, १७ गावांना सतर्कतेचा इशारा
Nashik : नाशिक जिल्ह्यात धरणांमधून पाण्याचा विसर्ग, १७ गावांना सतर्कतेचा इशारा

नाशिक (Nashik) जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून धरणांची पाणीपातळी वाढली आहे. बहुतांश धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. गंगापूरसह दारणा, पालखेड, कडवा ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे या धरणांतील अतिरिक्त पाणी नांदूर मधमेश्वरच्या माध्यमातून सोडण्यात आले आहे.

निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वरमधून गोदापात्रात १३ हजार ५०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. ओव्हरफ्लो झालेले धारणातील पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास १६ हजार ६५५ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला, मात्र दुपारनंतर पाण्याचा विसर्ग कमी करून, १३ हजार ५०० करण्यात आला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूर तालुक्यातील १७ गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुराच्या पाण्यात उतरू नका, अशी सूचनाही गावातील स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून गावकऱ्यांना देण्यात आली आहे.

(हेही वाचा-Cyber Fraud : पुण्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ, आठ महिन्यात २० कोटी रुपयांची फसवणूक)

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील धरणांतील उपलब्ध जलसाठा
गंगापूर –   ९७ टक्के
कश्यपी –  ८९ टक्के
पालखेड – ९७ टक्के
दारणा –   ८८ टक्के
भावली –  १०० टक्के
मुकणे –   ८९ टक्के
वाकी –    ८२ टक्के
भाम –     १०० टक्के

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.