Rahul Shewale : मानखुर्दमध्ये बच्चे कंपनीसाठी अवतरले तारांगण

तारांगणाची संकल्पना केंद्रस्थानी ठेवून उभारण्यात आलेला हा मुंबईतील पहिला सेल्फी पॉइंट असून खासदार राहुल शेवाळे यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आला आहे.

98

मुंबईच्या मानखुर्द येथे बच्चे कंपनीसाठी एक नवे आकर्षण सुरू झाले आहे. शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून भाभा अणुसंशोधन केंद्राच्या BRC गेट समोरील कै. बिंदुमाधव ठाकरे उद्यानाजवळ उभारण्यात आलेल्या तारांगण सेल्फी पॉइंटचे लोकार्पण शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी खासदार राहुल शेवाळे  Rahul  Shewale , माजी नगरसेविका कामिनी राहुल शेवाळे, विभागप्रमुख अविनाश राणे, महिला विभागप्रमुख सुनिता वैती यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

तारांगणाची संकल्पना केंद्रस्थानी ठेवून उभारण्यात आलेला हा मुंबईतील पहिला सेल्फी पॉइंट असून खासदार राहुल शेवाळे  Rahul  Shewale यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आला आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथील सेल्फी पॉइंट उभारणारे आर्टिस्ट सुरेश तारकर यांनी फायबर आणि इतर सामुग्रीचा वापर करून हा तारांगण सेल्फी पॉइंट बनवला आहे. सुमारे 150 फुटांवर उभारण्यात आलेल्या या सेल्फी पॉइंटमध्ये सहा फुटांचा सूर्य आणि त्याभोवती पृथ्वी सह अन्य ग्रह दाखविण्यात आले आहेत. याशिवाय अंतराळयान, आकाशात सोडलेला उपग्रह, चंद्र यांच्या प्रतिकृतिदेखील इथले खास आकर्षण ठरणार आहे.

(हेही वाचा शरद पवारांच्या भाकरी फिरवली पाहिजे वक्तव्याचा अर्थ सांगितला नरेश म्हस्केंनी; म्हणाले….)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.