Purnendu Patri : जाणून घ्या हरहुन्नरी कलाकार पूर्णेंदु पत्रींबद्दल

पत्री यांनी १९७१ साली प्रदर्शित झालेला चित्रपट 'स्ट्रीर पात्रा'चे दिग्दर्शन आणि पटकथा लेखन केले होते. या चित्रपटाला २० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये बंगालीत आलेला सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हणून 'सिल्व्हर लोटस' ने सन्मानित करण्यात आले.

172
Purnendu Patri : जाणून घ्या हरहुन्नरी कलाकार पूर्णेंदु पत्रींबद्दल

पूर्णेंदु पत्री (Purnendu Patri) हे एक भारतीय कवी, लेखक, संपादक, कलाकार, चित्रकार आणि चित्रपट दिग्दर्शकही होते. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १९३१ साली कलकत्त्यात हावडा जिल्ह्यातील नकोल या गावात झाला. पूर्णेंदु पत्री यांनी १९४९ साली इंडियन आर्ट कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. पत्री हे १९७१ ते १९८५ सालापर्यंत आनंद बाजार नावाच्या मॅगझीनचे पाहिले कला दिग्दर्शक होते.

(हेही वाचा – Interim Budget 2024 : युपीएच्या काळातील अर्थव्यवस्थेची दुरवस्था श्वेतपत्रिकेतून मांडणार – अर्थमंत्री निर्मला सीतारामन)

त्यांचा ‘एक मुठो रॉड’ नावाचा पहिला कवितासंग्रह १९५१ रोजी प्रकाशित झाला. १९५८ साली त्यांची ‘दानेर मोयना’ या नावाची पहिली कादंबरी प्रकाशित झाली होती. या कादंबरीसाठी त्यांना (Purnendu Patri) ‘माणिक स्मृती पुरस्कार ‘या त्या काळच्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘चित्रिता’ नावाचे चित्रपट मॅगझीन आणि ‘दीपाली’ नावाचे सांस्कृतिक मॅगझीनमध्ये त्यांनी पेंटींग्ज आणि लेखनातून योगदान दिला आहे.

पत्री (Purnendu Patri) यांनी १९७१ साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘स्ट्रीर पात्रा’चे दिग्दर्शन आणि पटकथा लेखन केले होते. या चित्रपटाला २० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये बंगालीत आलेला सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हणून ‘सिल्व्हर लोटस’ ने सन्मानित करण्यात आले. तसेच या चित्रपटाला ताशकंद चित्रपट महोत्सवात सर्वश्रेष्ठ दिग्दर्शनासाठी पुरस्कार देण्यात आला होता. यांसारखेच त्यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. (Purnendu Patri)

(हेही वाचा – Traffic Police Control Room Threat Call : मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश, सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला तपास)

त्यांच्या (Purnendu Patri) पेंटिंग्जचे स्वतंत्र प्रदर्शन १९८२ साली ब्रिटिश काउन्सिलिंग कलकत्ता येथे आयोजित करण्यात आले होते. त्यांनी बंकिम चंद्र चॅटर्जी यांच्यावर ‘द एरा ऑफ बंकिम’ यावर एक शोधक परियोजना सुरू केली होती. पण दुर्भाग्य असे की नियोजित पाच खंडांपैकी एकच खंड प्रकाशित होऊ शकला होता. १९ मार्च १९९७ साली वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. (Purnendu Patri)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.