Preity Zinta : अभिनयापासून आयपीएलपर्यंत…अशी आहे प्रीती झिंटाची कारकीर्द

174
Preity Zinta : अभिनयापासून आयपीएलपर्यंत...अशी आहे प्रीती झिंटाची कारकीर्द
Preity Zinta : अभिनयापासून आयपीएलपर्यंत...अशी आहे प्रीती झिंटाची कारकीर्द

प्रीती झिंटा ही एक यशस्वी अभिनेत्री आहे. ‘दिल से’ (Dil Se) या चित्रपटापासून तिचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला आणि आता ती आयपीएलशी संलग्न झाली आहे. प्रीती झिंटाचा (Preity Zinta) जन्म ३१ जानेवारी १९७५ रोजी शिमला येथे एका राजपूत घराण्यात झाला. तिचे वडील दुर्गानंद झिंटा सैन्यात अधिकारी होते आणि आईचे नीलप्रभा झिंटा…

(हेही वाचा – Hall Ticket For 10th Exam: दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकिट बुधवारपासून ऑनलाईन उपलब्ध होणार)

वडिलांचा अपघाती मृत्यू

प्रीती १३ वर्षांची असताना तिच्या वडिलांचा एका कार अपघातात मृत्यू झाला. तिची आईसुद्धा तिच्या वडिलांसोबत कारमधून प्रवास करत होती. या अपघातात तिची आई नीलप्रभा गंभीर जखमी झाली होती. दोन वर्षे ती हॉस्पिटलमध्ये होती. वडिलांच्या मृत्यूमुळे आणि आईच्या आजारपणामुळे प्रीतीच्या मनावर गंभीर परिणाम झाला. लहानपणीच तिला मॅच्युरिटी आली. तिला दोन भाऊ आहेत. मोठा भाऊ दीपंकर झिंटा, भारतीय सैन्यात अधिकारी आहे आणि लहान भाऊ मनीष झिंटा कॅलिफोर्नियामध्ये रहातो.

प्रीती झिंटाचं आयुष्य हे संघर्षमय राहिलं आहे. ती दोन वेळा मरता मरता वाचली आहे. २००४ साली कोलंबो येथे “टेम्पटेशन कॉन्सर्ट” (The Temptation Concert) मध्ये स्फोट झाला, जिथे ती आपल्या कलेचं सादरीकरण करत होती आणि त्याच वर्षात हिंदी महासागरात सुनामी आली होती, त्या वेळेस ती धोकादायक क्षेत्रात होती. मात्र दोन्ही वेळा ती सुदैवाने बचावली.

२००३ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार

१९९७ मध्ये तिचं ऑडिशन पाहून शेखर कपूर प्रभावित झाला होता. त्याने तिला ह्रतिक रोशनसोबत ’तारा रम पम पम’ मध्ये संधी दिली. मात्र तो चित्रपट रखडला. पुढे ’सोल्जर’ (Soldier) चित्रपट मिळाला. मात्र तिचा ’दिल से’ हा चित्रपट आधी प्रदर्शित झाला. त्यामुळे प्रेक्षकांसाठी तिच्या अभिनयाची कारकीर्द दिल से पासून सुरु झाली. ‘कल हो ना हो’ (Kal Ho Naa Ho) या चित्रपटासाठी तिला २००३ मध्ये फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

(हेही वाचा – Ayodhya: अयोध्या आस्था स्पेशल गाडी ७ फेब्रुवारीला सुटणार, भाविकांना रामललाचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी)

शिकागो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सिल्व्हर ह्यूगो पुरस्कार

२००३ मध्ये आलेला ’कोई… मिल गया’ (Koi… Mil Gaya) आणि २००४ चा ’वीर-झारा’ हे दोन चित्रपट खूप गाजले. तिच्या अभिनयाचे पुष्कळ कौतुक झाले. त्याचबरोबर ‘सलाम नमस्ते’ आणि ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटांमध्ये आधुनिक भारतीय स्त्रीची भूमिका साकारली. यामुळे ती हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री बनली. कॅनेडियन चित्रपट ’हेव्हन ऑन अर्थ’ मध्ये देखील तिने भूमिका केली होती. या चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला २००८ शिकागो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सिल्व्हर ह्यूगो पुरस्कार मिळाला.

२००८ मध्ये तिने तिचा पूर्वीचा प्रियकर नेस वाडिया, मोहित बर्मन आणि इतरांसोबत इंडियन प्रीमियर लीग T20 क्रिकेट संघ किंग्ज इलेव्हेन पंजाब विकत घेतला. त्याचबरोबर सप्टेंबर २०१७ मध्ये तिने दक्षिण आफ्रिकेची T20 ग्लोबल लीग टीम स्टेलेनबॉश किंग्ज फ्रँचायझी देखील घेतली आहे. त्याचबरोबर ती समाजकार्यात देखील सक्रिय असते. (Preity Zinta)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.