Global Polarization : ध्रुवीकरण हा जागतिक स्तरावरील धोका; तज्ञांनी दिला इशारा

71
Global Polarization : ध्रुवीकरण हा जागतिक स्तरावरील धोका; तज्ञांनी दिला इशारा
Global Polarization : ध्रुवीकरण हा जागतिक स्तरावरील धोका; तज्ञांनी दिला इशारा

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जागतिक स्तरावरील ध्रुवीकरणाविषयी अभ्यास करून चिंता व्यक्त केली आहे. फोरमने याचे दुष्परिणामही सांगितले आहेत. ‘ध्रुवीकरण हा जागतिक स्तरावरील सर्वांत मोठा सामाजिक धोका आहे’, असे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने म्हटले आहे. (Global Polarization)

(हेही वाचा – Pune Cab Drivers Strike : पुण्यात कॅबचालकाचे २० फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन, कशासाठी ? वाचा सविस्तर)

परस्पर सहकार्याची भावना सशक्त करा

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (World Economic Forum) १,५०० जागतिक नेत्यांचे मत घेऊन हे मत मांडले आहे. फोरमने म्हटले आहे की, या आव्हानावर परस्पर सहकार्याने मात करणे शक्य होऊ शकते. म्हणतात, एकत्र काम करण्याची भावना ही मानवाची सर्वांत मोठी शक्ती होय. संघर्षाचा धोका असतोच, पण सहकार्याचे शास्त्र दाखवते की, मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करून आपण मोठे आव्हान परतवू शकतो. परस्पर सहकार्याची भावना आपल्याला सशक्त करायची आहे.

काय म्हणतात मायकेल मुथुकृष्णा

‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधील (London School of Economics) आर्थिक मानसशास्त्राचे प्राध्यापक मायकेल मुथुकृष्णा यांनी म्हटले आहे की, जेव्हा लोक ध्येय साध्य करण्यासाठी अधिक लोकांसमवेत काम करतात, तेव्हा सहकार्याची भावना निर्माण होते. हा सहकाराचा नियम आहे. परस्पर लाभांमुळे दोन देशांमधील व्यापार युद्धाचा धोका अल्प होतो. एकत्र काम करून आपण विभक्तीकरण, ध्रुवीकरण आणि हवामान पालट यांसारख्या जगातील सर्वांत मोठ्या आव्हानांना तोंड देऊ शकतो. (Global Polarization)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.