Pune Cab Drivers Strike : पुण्यात कॅबचालकाचे २० फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन, कशासाठी ? वाचा सविस्तर

या आंदोलनात सुमारे २० हजार कॅब चालक सहभागी होणार असल्याचा दावा डॉ. केशव क्षीरसागर यांनी केला आहे.

152
Pune Cab Drivers Strike : पुण्यात कॅबचालकाचे २० फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन, कशासाठी ? वाचा सविस्तर
Pune Cab Drivers Strike : पुण्यात कॅबचालकाचे २० फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन, कशासाठी ? वाचा सविस्तर

पुण्याच्या प्रादेशिक परिवहन समितीने ‘कॅब’साठी दर निश्चित केले आहेत, मात्र पुण्यात प्रवासी सेवा देणाऱ्या ओला, उबेरसारख्या कंपन्या त्या दराची अंमलबजावणी करीत नाहीत. यामुळे कॅब चालकांचे नुकसान होत आहे.

कॅब कंपन्यांनी दराची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी इंडियन गिग वर्कर्स फ्रंटच्या वतीने मंगळवारपासून (२० फेब्रुवारीपासून) कॅब चालक संप करणार आहेत, असे इंडियन गिग वर्कर्स फ्रंटचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.

(हेही वाचा – Brazil Out of Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमधून बलाढ्य ब्राझील आऊट)

प्रादेशिक परिवहन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी कॅब कंपन्यांसाठी दर पत्रक जाहीर केले. १ जानेवारी २०२४ पासून नवीन दर लागू झाले, मात्र ओला, उबेर यासारख्या कंपन्या प्रत्यक्षात त्या दराची अद्याप अंमलबजावणी करत नाहीत. याचा फटका कॅबचालकांना बसत आहे. नवीन दर लागू झाल्यास कॅबचालकांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ होईल आणि वाढीव दराचा व्यवसायावर परिणाम होईल. या भीतीने कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांनी अद्याप दराची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे २० फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता संगम ब्रिजजवळ आरटीओ कार्यालयासमोर कॅब चालक एकत्रित येऊन निदर्शने करणार आहेत. या आंदोलनात सुमारे २० हजार कॅब चालक सहभागी होणार असल्याचा दावा डॉ. केशव क्षीरसागर यांनी केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.