पतंजली आता शेअर बाजारात उतरणार, किती IPO आणणार?

103

भारतात योगाभ्यासाच्या माध्यमातून जनसामान्यांचे आरोग्य स्वास्थ्य उत्तम ठेवणा-या योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजलीने आयुर्वेदिक उत्पादने तयार करण्याचा सपाटा लावला. देशासह आंतरराष्ट्रीय बाजारातही स्वतःचे स्थान मिळवले. आता पतंजली शेअर मार्केटमध्ये उतरणार आहे.  त्याची घोषणा स्वतः रामदेव बाबा यांनी केली. एकूण ४ कंपन्या ४ वर्षांत शेअर बाजारात लिस्टेड करण्यात येणार आहे, असे रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

५ लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्याचे लक्ष्य गाठण्याचे ध्येय

पतंजली फूड्सनंतर पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस, पतंजली मेडिसिन आणि पतंजली लाइफस्टाइल या पतंजलीच्या चार कंपन्यांचे आयपीओ लाँच करण्याचे ध्येय पतंजलीने ठरवले आहे. सध्या पतंजली फूड्स भारतीय शेअर बाजारात लिस्टेड आहे. यासोबतच कंपनीने ५ लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्याचे लक्ष्य गाठण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेदने रिझोल्यूशन प्रक्रियेअंतर्गत रुची सोया २०१९ मध्ये ४,३५० कोटी रुपयांना विकत घेतली होती. ही कंपनी आधीच शेअर बाजारात लिस्ट झाली होती. दरम्यान, यावर्षी २००२ मध्ये बाबा रामदेव यांनी कंपनीचे नाव रुची सोया वरून बदलून पतंजली फूड्स केले.

(हेही वाचा दस-याला शिवाजी पार्कवर असणार शुकशुकाट? मेळाव्यासाठी दोन्ही गटांना परवानगी नाकारण्याची शक्यता)

FSSAI वर गंभीर आरोप 

पतंजलीची घोडदौड सांगतानाच बाबा रामदेव यांनी FSSAI वर मोठा आरोप केला. पतंजलीचे तूप जगभर विकले जाते आणि त्याच्या गुणवत्तेवर कोणताही प्रश्न उद्भवत नाही. पण, भारतात ती चाचणीत अपयशी ठरते. पतंजलीविरोधात षडयंत्र रचले जात आहे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.