दिलासा! पन्नासहजारांपेक्षा जास्त रुग्णांनी एका दिवसांत केली कोरोनावर मात

110

राज्यात ओमायक्रॉनच्या विषाणूमुळे तिसरी लाट येऊन चार आठवडे होताच रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे चित्र गेल्या चार दिवसांपासून पाहायला मिळत आहे. गुरुवारी चक्क ५२ हजार २५ रुग्णांना एका दिवसांत राज्यातील विविध भागांतून डिस्चार्ज दिला गेला. तिस-या लाटेचा सामना करताना एवढ्या मोठ्या संख्येत पहिल्यांदाच गुरुवारी डिस्चार्ज संख्येची एवढी मोठी आकडेवारी दिसून आली.

दरदिवसाला डिस्चार्ज रूग्ण संख्येत वाढ

गुरुवारी राज्यात ४६ हजार १९७ नव्या रुग्णांचे निदान झाले. ३७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात सध्या २ लाख ५८ हजार सक्रीय रुग्णांवर विविध भागांत उपचार सुरु आहेत. दरदिवसाला डिस्चार्ज संख्या वाढत असल्याने एकूण संख्या वेगाने वाढत नसल्याने तिसरी वाट दुस-या लाटेच्या तुलनेत अद्यापही फारशी आव्हानात्मक ठरली नसल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिली.

१२५ रुग्ण हे केवळ पुण्यातच 

दरम्यान, राज्यात ओमायक्रॉनच्या नव्या १२५ रुग्णांच्या नोंदीमुळे राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा आता २ हजार १९९ वर पोहोचला आहे. १२५ रुग्ण हे केवळ पुण्यातच नोंदवले गेले. त्यापैकी ८७ रुग्णांची नोंद भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेने तर ३८ राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने  केले आहेत.

केरळमध्ये कोरोनाचा प्रकोप 

राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल ४६ हजार ३८७ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोरोना संसर्गामुळे राज्यात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोरोना मृत्यूच्या यादीत ३०९ मृत्यूंचा समावेश करण्यात आला आहे. मृतांची संख्या ५१,५०१ झाली आहे.

राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी केरळमध्ये नवीन कोरोना व्हेरिएंट ओमिक्रॉनची ६२ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आता राज्यात ओमिक्रॉनचा एकूण आकडा ७०७ झाला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत दिल्लीत १२,३०६ नवीन कोरोना बाधित आढळले आहेत. या दरम्यान, ४३ मृत्यूची नोंद झाली आहे. सक्रिय प्रकरणे ६८,७३० आहेत आणि पॉझिटीव्हिटी रेट हा २१.४८ टक्के आहे. यापूर्वी देखील केरळमध्ये ईदेच्या सणाला सोशल डिस्टंन्सीग आणि लॉकडाऊनच्या नियमांचा मोठ्या प्रमाणात भंग झाल्यामुळे कोरोना केसेस प्रचंड वाढल्या होत्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.