Veer Savarkar यांच्या जयंतीनिमित्ताने सावरकर स्मारकात साकारतेय २२२२२ नाण्यांच्या सहाय्याने शिवरायांची प्रतिमा

1393

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या जयंतीनिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात २४ मे ते २६ मे दरम्यान विविध चित्र प्रदर्शन, रक्तदान शिबीर आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून २ रुपयांच्या २२ हजार २२२ नाण्यांच्या साहाय्याने १२ बाय १३ फूट छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारण्यात येणार आहे. त्या भव्य प्रतिमेच्या निर्मितीच्या आधी या उपक्रमाचे पूजन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सह कार्यवाह आणि ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि पुष्पहार अपूर्ण करून करण्यात आले.

shivrai1

(हेही वाचा मुघलांच्या इतिहासाची भलावण करणाऱ्या Sharad Pawar यांना भगवद्गीता आणि मनाचे श्लोक डोळ्यांत खुपतायेत…)

प्रसिद्ध छायाचित्रकार रंजन गावडे हे अनेक वर्षांपासून २ रुपयांच्या नाण्यांचे संकलन करत आहेत. महाराष्ट्रासह कोलकाता, मध्य प्रदेश, गुजरात येथून ही नाणी संकलित केली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या जयंतीनिमित्ताने ही जमवलेली नाणी सार्थकी लागावीत म्हणून रंजन गावडे यांनी या नाण्यांच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रसिद्ध चित्रकार सागर पाठणकर यांनी १२ बाय १३ फुटाची महाराजांची प्रतिमा रेखाटली असून त्यावर या नाण्यांची सजावट केली जाणार आहे. या भव्य प्रतिमेचे शनिवार, २५ मे रोजी अनावरण होणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.